ग्रामस्थांच्या आग्रहास्तव होणार फेरसुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:20 AM2018-01-18T01:20:56+5:302018-01-18T01:21:02+5:30
पनवेल, उरण आणि ठाणे परिसरातून जाणाºया मल्टी मॉडेल कॉरिडॉर प्रकल्पाच्या जनसुनावणीत पनवेल तसेच उरण परिसरातील स्थानिक ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला.
पनवेल : पनवेल, उरण आणि ठाणे परिसरातून जाणाºया मल्टी मॉडेल कॉरिडॉर प्रकल्पाच्या जनसुनावणीत पनवेल तसेच उरण परिसरातील स्थानिक ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे १७ जानेवारी रोजी पनवेल येथे आयोजित करण्यात आलेली बैठक अर्धवट सोडून फेरसुनावणी घेण्याची वेळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड यांच्यावर आली. या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांना योग्य माहिती नसल्याने योग्य माहिती देऊन फेर सुनावणी घेण्याची मागणी केली होती.
मल्टी मॉडेल कॉरिडॉर प्रकल्पाबाबत बुधवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड यांच्या वतीने नवीन पनवेल येथील पिल्लई महाविद्यालयात पर्यावरणाबाबत जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्रादेशिक अधिकारी अनंत हर्षवर्धन, उपविभागीय अधिकारी डी. आर. नवले, सचिन आडकर यांच्या उपस्थितीत ही जनसुनावणी घेण्यात आली. या अधिकाºयांसोबत पनवेल आणि उरण परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. जनसुनावणी सुरू झाल्यानंतर उरण विभागातील समाजसेवक संतोष पवार आणि काही रहिवाशांनी जनसुनावणीचा निषेध व्यक्त करत ही जनसुनावणी तहकूब तसेच स्थगित करण्याची मागणी केली. आजचा दिवस हा उरणकरांसाठी प्रेरणादायी असा दिवस असल्याचे संतोष पवार यांनी सांगितले. उरणच्या लढ्यात या वेळी ५ हुतात्मा झाले होते. त्यांच्या आठवणींचा आजचा दिवस हुतात्मा दिन म्हणून आयोजित केला जातो. या हुतात्मा दिनी ही जनसुनावणी ठेवल्यामुळे हा निषेध व्यक्त करण्यात आला. निषेध व्यक्त करून ग्रामस्थांनी या प्रकल्पाची माहिती तसेच या जनसुनावणीची माहिती शेतकºयांना नसल्यामुळे ही सुनावणी तहकूब करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र यावेळी उपस्थित प्रदूषण मंडळ अधिकाºयांनी ही जनसुनावणी सुरूच ठेवून ग्रामस्थांची बाजू ऐकून घेऊन त्यांना या प्रकल्पाची माहिती दिली.
जनसुनावणीसाठी ३० ग्रामस्थ उपस्थित होते. प्रदूषण मंडळाच्या वतीने पिल्लई कॉलेज नवीन पनवेल येथे घेतलेल्या जनसुनावणीला खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र दिसून येत होते. केवळ ३० ग्रामस्थांच्या उपस्थितीत जनसुनावणी सुरू झाली.