नामदेव मोरे / नवी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक वर्षी अडवली भुतावली प्रादेशिक उद्यान, गवळीदेव पर्यटन केंद्र व खाडी किनाऱ्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येते. परंतु हे सर्व प्रकल्प कागदावरच राहिले आहेत. अडवली - भुतावलीची जमीन बिल्डरांच्या घशात गेली असून उरलेल्या जमिनीवर अतिक्रमण होवू लागले आहे. नवी मुंबईला निसर्गाचे वरदान लाभले आहे. शहराच्या एका बाजूला डोंगररांग व दुसऱ्या बाजूला खाडी किनारा आहे. पण हा नैसर्गिक ठेवा जपण्यामध्ये व त्याचे पर्यटनस्थळांमध्ये रूपांतर करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. महापालिकेने यापूर्वी अडवली - भुतावली परिसरामध्ये तब्बल ६४४ हेक्टर जमिनीवर प्रादेशिक उद्यान बनविण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ५१३ हेक्टर वनजमीन व १३० हेक्टर खाजगी जमिनीचा समावेश होता. यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेने प्रस्तावही मंजूर केला होता. पण आता या उद्यानाचा हेड अर्थसंकल्पातूनच गायब झाला आहे. येथील जमीन बिल्डरांच्या घशात गेली असून तेथे भव्य टाऊनशीप उभारण्याचा प्रस्ताव नगररचना विभागाकडे सादर करण्यात आला आहे. याविषयी प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यानंतर हा प्रकल्प बारगळला होता, पण आता पुन्हा त्याला परवानगी देण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अडवली - भुतावलीप्रमाणेच गवळीदेव निसर्ग पर्यटन स्थळाचा विकास करण्याची योजनाही कागदावरच राहिली आहे. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाते, पण प्रत्यक्षात पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी काहीच हालचाली केल्या जात नाहीत. पालिकेच्या मोरबे धरण परिसरामध्ये १०० एकरपेक्षा जास्त भूखंडावर पर्यटनस्थळ विकसित केले जाणार होते. पण प्रत्यक्षात काहीच कार्यवाही झालेली नाही. दिवा ते दिवाळेपर्यंतच्या खाडीकिनाऱ्यावर चौपाटी विकसित करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पामध्ये भव्य प्रकल्प असावे व अर्थसंकल्प परिपूर्ण करण्यासाठी अशाप्रकारच्या योजनांचा समावेश त्यामध्ये करण्यात येतो. पण प्रत्यक्षात वर्षभरामध्ये त्या योजना कार्यान्वित करण्यासाठी फारसे प्रयत्न प्रशासनाकडून होत नाहीत. मागील वर्षभरामध्ये एकही नवीन उद्यान व इतर प्रकल्प सुरू झालेला नाही. सद्यस्थितीमध्ये वंडर्स पार्क व ज्वेल्स आॅफ नवी मुंबईवगळता इतर कोठेच नागरिकांनी विरंगुळ्यासाठी जावे असे ठिकाण नाही. अडवली भुतावली प्रादेशिक उद्यानाचे क्षेत्र गावाचे नाववनजमीनखाजगी जमीनएकूण अडवली, भुतावली३५५.९०९५४५०.८०बोरीवली१५८.१२१३०.८६६४४.७८एकूण क्षेत्रफळ५१३.९२१३०.८६६४४.७८अर्थसंकल्पातील तरतूद प्रकल्पतरतूदगवळीदेव १ लाखकृत्रिम चौपाटी१० कोटी वॉटर बॉडी सुशोभीकरण३ कोटी
प्रादेशिकसह निसर्ग उद्यानाला मुहूर्त मिळेनाच
By admin | Published: February 22, 2017 7:05 AM