पनवेल : असंघटित कामगारांची नोंद यापूर्वीच्या सरकारने केली नाही, त्यामुळे त्यांना शासकीय लाभ मिळाले नाहीत आता त्यांची नोंद करण्याचे काम सुरू झाले आहे, अशी माहिती कामगारमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी नवीन पनवेल येथे दिली.भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे २२वे त्रैवार्षिक दोन दिवशीय अधिवेशन नवीन पनवेल येथील सिकेटी विद्यालयात रविवारपासून सुरू झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन संभाजीराव निलंगेकर-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजपाचे जिल्हाअध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, भा.म.चे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. सुरेंद्र, क्षेत्रप्रभारी डॉ. सुधाकर कुळकर्णी, महापलिकेच्या महिला व बाल सभापती दर्शना भोईर, आरोग्य सभापती डॉ. अरु णकुमार भगत उपस्थित होते.साडेतीन वर्षांच्या कालावधीत आपल्या सरकारने एकाही कंपनीला बंदची नोटीस दिली नाही. माथाडी कामगारांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपुलकी आहे. माथाडी कामगार कधी मोठा झाला नाही; पण नेत्यांची घरे मात्र मोठी झाली. त्यामुळे आता सरकार आणि माथाडी कामगार यामध्ये कोणी मध्यस्थ असणार नाही. तीन कोटी ६५ लाख असंघटित कामगारांची नोंदणी झाली नव्हती. त्यांना लाभ देण्यासाठी शासनाने त्यांची नोंदणी करण्याला प्राधान्य दिले आहे, असेसांगून असंघटित कामगारांच्या मागेशासन उभे असल्याची ग्वाही संभाजीराव निलंगेकर-पाटील यांनी यावेळी पुढे बोलताना आपल्या भाषणातून दिली.
शासकीय लाभासाठी असंघटित कामगारांची नोंदणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 3:34 AM