रिलायन्स रिटेल्सची फसवणूक

By admin | Published: May 9, 2017 01:35 AM2017-05-09T01:35:19+5:302017-05-09T01:35:19+5:30

रिलायन्स रिटेल कंपनीची तब्बल ३६ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी संशयित म्हणून कंपनीमध्ये

Reliance Retails fraud | रिलायन्स रिटेल्सची फसवणूक

रिलायन्स रिटेल्सची फसवणूक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : रिलायन्स रिटेल कंपनीची तब्बल ३६ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी संशयित म्हणून कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रीती पनवार, न्यू टेक्नो कंपनीचे केशव सिंग व कुणाल सिंग यांच्याविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे.
रिलायन्स रिटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत असलेल्या दिव्या अनिल गुप्ता यांनी याविषयी तक्रार दिली आहे. कंपनीमध्ये प्रीती पनवार ही इन्स्टिट्यूशन डिपार्टमेंट सेल्स कोआॅर्डिनेटर म्हणून काम करत होती. कंपनीचा पूर्ण भारतामध्ये किती माल विक्री झाला, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत काय असावी याचा मासिक अहवाल कंपनीचे मुख्य व्यवस्थापक करेन्ट सिराओ यांना देण्याची जबाबदारी तिच्यावर होती. याशिवाय मुख्य कार्यालयामध्ये एखाद्या ग्राहकाने परस्पर मालाची आॅर्डर दिली तर त्याची किंमत ठरविणे, मालाची उपलब्धता पाहून त्याचे वितरण कसे होईल हे विक्री विभागाशी समन्वय ठेवून ठरविण्याचेही काम तिच्याकडे होेते. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. यामुळे नियमितपणे मोठ्या प्रमाणात माल खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे व्हर्च्युअर खाते सिटी बँकमध्ये सुरू केले असून प्रत्येक ग्राहकाला स्वतंत्र कोड दिलेला आहे. यामुळे ग्राहकाने पैसे भरले की ते तत्काळ कंपनी व्यवस्थापनास समजते. कंपनीचे नियमित ग्राहक अंतिक आग्रवाल यांचा ईनेट स्टुडिओ आहे. त्यांनी रिलायन्सचे सीएफओ राजेंद्र कामत यांना ३० सप्टेंबर २०१६ रोजी पत्र पाठवून तक्रार केली. त्यांनी ३०० मोबाइलची आॅर्डर दिली होती. त्यासाठी व्हर्च्युअर खात्यातून रिलायन्सला ३६ लाख ७५ हजार रुपये दिले असून मोबाइल मिळाले नसल्याचे कळविले.
कामत यांनी रिलायन्स व्यवस्थापनाकडे केलेली तक्रार कंपनीने दक्षता विभागाकडे पाठविली. दक्षता विभागाने चौकशी केली असता त्यांच्या निदर्शनास आले की प्रीती पनवार यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवरून अंकित आग्रवाल यांना आरटीजीएस करण्यासाठी व्हर्च्युअर खाते क्रमांक पाठविला. वास्तविक तो रिलायन्स कंपनीचा नसून केशव व कुणाल सिंग यांच्या न्यू टेक्नो कंपनीचा असल्याचे निदर्शनास आले. त्या दोघांनी या पैशाच्या साहाय्याने कंपनीमध्ये माल खरेदी केला आहे. पनवारच्या चुकीमुळे कंपनीचे नाव खराब होवू नये यामुळे कंपनीने ते पैसे दिले आहेत. रिलायन्सच्या दक्षता विभागाचे प्रमुख राकेश ठाकूर, मुक्तार शेख यांच्यासमोर पनवारने सिंग बंधंूबरोबर केलेल्या व्यवहाराची कबुली दिली आहे. सिंग बंधूंकडून तिला कमिशन मिळाल्याचीही कबुली दिली होती. पनवार हिने जून २०१४ ते नोव्हेंबर २०१६ दरम्यान कंपनीमध्ये इन्स्टिट्यूशन डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना ३६ लाख ७५ हजार रुपयांचा अपहार केला असल्याचे निदर्शनास आल्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापक दिव्या गुप्ता हिने रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Reliance Retails fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.