शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मुंबईकरांना दिलासा, भाजीपाला झाला स्वस्त, आवक वाढली

By नामदेव मोरे | Published: January 04, 2024 5:37 PM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरूवारी ६५६ वाहनांमधून २६७२ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे.

नवी मुंबई : वाहतूकदारांच्या संपामुळे आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढले होते. गुरूवारी पुन्हा आवक वाढल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आले असून दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरूवारी ६५६ वाहनांमधून २६७२ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ४ लाख ५७ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. बुधवारी ५४७ वाहनांमधून २०२८ टन आवक झाली होती. पुणे, नाशिकसह देशाच्या विविध भागातून आवकही सुरू झाली आहे. आवक वाढल्यामुळे बाजारभाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. 

भेंडीचे दर प्रतीकिलो ३० ते ५५ वरून २५ ते ४५ रुपये किलोवर आले आहेत. दुधी भोपळा २४ ते ३२ वरून १५ ते २० वर आले आहेत. फरसबी ४७ ते ५७ वरून ३० ते ४० रुपयांवर आले आहेत. फ्लॉवर, गाजर, गवार, घेवडा, कोबी, ढोबळी मिर्ची, शेवगा शेंग, वाटाणा यांचे दरही घसरले आहेत. वाहतूकदारांच्या संपामुळे मागणीच्या तुलनेमध्ये आवक कमी होत असल्याने दर वाढले होते. आवक सुरळीत झाल्याने दर घसरले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई बाजार समितीमधील भाजीपाल्याचे दर पुढील प्रमाणेवस्तू - ३ जानेवारी - ४ जानेवारीवाटाणा - ६५ ते ७५ - ३५ ते ४०भेंडी - ३० ते ५५ - २५ ते ४५दुधी भोपळा - २४ ते ३२ - १५ ते २०फरसबी ४७ ते ५७ - ३० ते ४०फ्लॉवर २४ ते २७ - १६ ते २२गाजर ५४ ते ६१ - ३० ते ४०गवार - ५५ ते ६५ - ४५ ते ५५काकडी १० ते २५ - ८ ते १५कोबी १४ ते २४ - ९ ते १२ढोबळी मिर्ची ४५ ते ५५ - ३८ ते ४८दोडका ४० ते ५० - ३० ते ४०टोमॅटो १५ ते ३२ - १२ ते २४

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईvegetableभाज्या