नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये गुंडाराज सुरू आहे. डी विंगमध्ये होलसेल व्यापाºयाने किरकोळ व्यापाºयाला बेदम मारहाण केली आहे. येथे नियम धाब्यावर बसवून व्यवसाय सुरू आहे. वारंवार राडेबाजी सुरू असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
तुर्भेमध्ये राहणारा स्वामीनाथन वर्मा व त्याचा भाऊ संतोष हे दोघे भाजी मार्केटमधील डी विंगमध्ये व्यवसाय करत आहेत. व्यवसायासाठी लागणारा माल मार्केटमधूनच खरेदी केला जातो. दोन महिन्यापूर्वी त्यांनी संतोष टावरे याच्याकडून माल खरेदी केला होता. त्याचे एक हजार रूपये थकबाकी होती, परंतु कामानिमित्त उत्तरप्रदेशमधील मूळ गावी गेल्यामुळे उधारी देता आली नव्हती. गावावरून आल्यानंतर २७ आॅगस्टला पुन्हा मार्केटमध्ये व्यवसाय करण्यासाठी आल्यानंतर टावरे याने उधारीचे १३७० रूपये मागितले. वर्मा यांनी १ हजार रूपयेच उधारी असल्याचे सांगून ती दिली. पण याचा राग आल्याने टावरे व त्याच्या सहकाºयांनी त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. पट्ट्याने चेहºयावर मारहाण केल्यामुळे डोळ्याजवळ जबर दुखापत झाली आहे. याविषयी तक्रार करण्यासाठी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेण्यात आली. पोलिसांनी वर्माला उपचारासाठी महापालिकेच्या वाशी रूग्णालयात पाठविले व त्याच्या तक्रारीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.एक आठवड्यापूर्वी डी विंगमध्ये एक कामगाराने आत्महत्या केली होती. मार्केटमध्ये दोन परप्रांतीय कामगारांमध्ये उधारीच्या पैशावरून मारहाण झाल्याची घटना होवून त्याविषयी गुन्हाही दाखल झाला आहे. या ठिकाणी मारामारीच्या घटना वारंवार होवू लागल्या आहेत.भाजी मार्केटच्या डी विंगमध्ये नियमबाह्य कामकाज केले जात आहे. याठिकाणी ५०० पेक्षा जास्त परप्रांतीय विक्रेते भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे बाजार समितीचा व्यवसाय परवानाच नाही. गाळेधारकांनी नियम धाब्यावर बसून त्यांना भाडेतत्त्वावर गाळे उपलब्ध करून दिले आहेत. या ठिकाणी वारंवार मारामारीच्या घटना होत आहेत. व्यापारी ग्राहकांनाही मारहाण करत असल्याच्या घटना होवू लागल्या आहेत.संघटनांचे अभयडी विंग व एकूण भाजी मार्केटमध्ये कायदा हातात घेण्याचे प्रमाण वाढत आहे. व्यापारी ग्राहकांना व सहकाºयांना मारहाण करत असल्याच्या घटना घडत आहेत. मारहाणी झालेली व्यक्ती पोलीस स्टेशनला गेल्यानंतर काही व्यापारी प्रतिनिधी व संघटना गुन्हा दाखल न करण्यासाठी दबाव आणत आहेत. संघटना पाठीशी घालत असल्यामुळे कायदा हातात घेणाºयांचे मनोबल वाढत आहे.कारवाईकडे दुर्लक्षअवैधपणे व्यवसाय करणाºयांना प्रशासनही पाठीशी घालत आहे. डी विंगमध्ये विनापरवाना व्यवसाय करणाºयांवर कारवाई केली जात नाही. मध्यंतरी पॅसेजमधील विक्रेत्यांवर कारवाई केली पण गाळ्यांमधील एकावरही कारवाई झालेली नाही.