टोल नाक्यावरील उर्वरित 22 कर्मचारीदेखील कामावर रूजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 01:50 PM2020-08-23T13:50:03+5:302020-08-23T13:50:12+5:30
ठेकेदार व कामगारांच्या शिष्टमंडळात यशस्वी तोडगा
पनवेल: लॉकडाऊनच्या काळात सायन पनवेल महामार्गावरील 39 कामगारांना टोल कंत्राटदाराची कामावरून तडकाफडकी कमी केले होते. कंत्राटदार केएमडीआर सर्व्हिसेस यांच्या या धोरणाने या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका स्वीरल्यानंतर कंत्राटदाराने या संबंधित कामगारांना कामावर परत घेण्यास तयारी दर्शविली आहे.
या कर्मचाऱ्यांमध्ये अटेन्डन्स, इंचार्ज, सुपरवायझर आदी पदांवर हे कर्मचारी कार्यरत आहेत.यापूर्वी स्थानिक आमदार आणि टोल कंत्राटदार राजकुमार ढाकणे यांच्या बैठकीत 39 पैकी 17 कामगारांना कामावर नव्याने रुजु करण्याची तयारी ढाकणे यांनी दाखविली होती.यावेळी उर्वरित 22 कामगारांचा समावेशनाचा प्रश्न प्रलंबित असताना शेकाप नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी पुढाकार घेत ढाकणे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्यांनतर या 22 कामगारांना देखील टोल नाक्यावर कामावर घेण्यास डि आर सर्व्हिसेसचे ढाकणे यांनी तयारी दर्शविल्याने शुक्रवार पासुन 22 कामगार कामावर रूजू झाले आहेत.मागील पाच महिन्यापासून घरी बसलेल्या या कामगारांवर लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली होती.नव्याने कामावर रूजू केल्याने कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी देखील यशस्वी तोडगा काढल्याने कामगारांनी त्यांचे आभार मानले आहेत.संबंधित 39 कामगारांना पीएफ आणि थकीत पगार मिळवुन देण्यासंदर्भात देखील माझा पाठपुरावा सुरु असल्याचे नगरसेवक गायकर यांनी सांगितले.
सायन पनवेल महामार्गावरील खारघर व कामोठे याठिकाणी अवजड वाहनांकडून याठिकाणी टोल वसुली केली जाते.