रिमोटवर चालणारी विदेशी सिग्नल यंत्रणा निरुपयोगी; वाहतूक पोलिसांवर ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 03:12 AM2018-06-04T03:12:51+5:302018-06-04T03:12:51+5:30
सिग्नल यंत्रणा अद्ययावत करत शहरात सात ठिकाणी विदेशी तंत्रज्ञानावर आधारित सिग्नल बसवण्यात आले आहेत. मात्र हे सिग्नल पादचाऱ्यांच्या इशाºयावर चालत नसल्याने हात दाखवून रस्ता ओलांडा या देशी पध्दतीवरच त्याठिकाणी रस्ता ओलांडला जात आहे
नवी मुंबई : सिग्नल यंत्रणा अद्ययावत करत शहरात सात ठिकाणी विदेशी तंत्रज्ञानावर आधारित सिग्नल बसवण्यात आले आहेत. मात्र हे सिग्नल पादचाऱ्यांच्या इशाºयावर चालत नसल्याने हात दाखवून रस्ता ओलांडा या देशी पध्दतीवरच त्याठिकाणी रस्ता ओलांडला जात आहे, तर काही ठिकाणी ही अद्ययावत यंत्रणा बसवल्याचे माहीतच नसल्याचे विदेशी सिग्नल यंत्रणा निरुपयोगी ठरत आहे.
महापालिकेने पादचाºयांच्या सोयीसाठी विदेशी संकल्पनेनुसार शहरात अद्ययावत सिग्नल यंत्रणा बसवण्याला सुरवात केली आहे. त्यानुसार मार्च महिन्यात प्राथमिक स्वरूपात सात ठिकाणी ही यंत्रणा अवगत करण्यात आली. त्याठिकाणी सिग्नलचा रिमोट पादचाºयांच्या हाती देण्यात आलेला आहे. पादचाºयांकडून तिथले बटण दाबले गेल्यास ठरावीक वेळानंतर सिग्नल लागून त्यांना रस्ता ओलांडण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी त्यामागची संकल्पना आहे. मात्र सातपैकी बहुतांश ठिकाणची ही विदेशी सिग्नल यंत्रणा कोलमडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यापैकी ऐरोली व ठाणे-बेलापूर मार्गावरील यंत्रणा पुलाच्या कामादरम्यान वाहतूककोंडी टाळण्यासाठी बंद ठेवल्याचे सांगितले जात आहे. तर नुकतेच पूल वापरासाठी खुले झाल्याने तिथले विदेशी तंत्रज्ञानावरील सिग्नल सुरू केले जातील, असेही अधिकाºयांकडून सांगितले जात आहे.
परंतु सिग्नलचा रिमोट पादचाºयांच्या हाती देवूनही त्याचा उपयोग होत नसल्याची खंत सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. याकरिता बेशिस्त चालकांची मानसिकता कारणीभूत असल्याचाही आरोप केला जात आहे.
दुबई, सिंगापूर, मलेशिया आदी देशांमधील सिग्नल यंत्रणेचे तंत्रज्ञान वापरुन नवी मुंबई महापालिकेनेही पादचाºयांची काळजी घेण्याला सुरवात केली आहे.
त्याकरिता कोपरखैरणेतील डी मार्ट चौक, स्वामी विवेकानंद चौक, ऐरोलीतील पुरुषोत्तम खेडकर चौक, स्वामी समर्थ चौक तसेच ठाणे -बेलापूर मार्गावर मुकुंद कंपनीसमोर, भारत बिजली चौक आणि रबाळे जंक्शन याठिकाणी अद्ययावत तंत्रज्ञानावरील सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र सिग्नल लागलेला असतानाही पादचाºयांना रस्ता ओलांडण्याची संधी न देता वाहने पळवण्याची शहरातील बहुतांश चालकांची मानसिकता दिसून येत आहे. यामुळे रस्ता ओलांडण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत पादचाºयांना थांबावे लागत आहे.
पर्यायी सिग्नल लागलेला आहे की सुरू याचा विचार न करता देशी पध्दतीनेच येणाºया वाहनाला हात दाखवून रस्ता ओलांडण्याचा मार्ग अवलंबावा लागत आहे. त्यामुळे पालिकेकडून सिग्नल यंत्रणेच्या आधुनिकीकरणावर होणारा खर्च
व्यर्थ जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
शहरात बसवलेली विदेशी पद्धतीची सिग्नल यंत्रणा सुस्थितीत असल्याचा आढावा शनिवारीच घेण्यात आलेला आहे. ठाणे-बेलापूर मार्गावरील पुलाच्या कामादरम्यान तिथली यंत्रणा बंद ठेवण्यात आली होती. लवकरच ती पुन्हा सुरु केली जाईल.
- प्रवीण गाडे, पालिका अभियंता