‘बुलेट ट्रेन’च्या मार्गातील वनजमिनींचा अडथळा दूर; ठाणे-पालघरची ३२४ एकर जमीन रेल्वे काॅर्पोरेशनकडे सुपुर्द

By नारायण जाधव | Published: July 29, 2023 06:49 AM2023-07-29T06:49:23+5:302023-07-29T06:49:40+5:30

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील एका मागोमाग एक अडथळे राज्य सरकारकडून दूर केले जात आहेत.

Removal of obstruction of forest lands in the path of 'bullet train'; 324 acres of Thane-Palghar land handed over to Railway Corporation | ‘बुलेट ट्रेन’च्या मार्गातील वनजमिनींचा अडथळा दूर; ठाणे-पालघरची ३२४ एकर जमीन रेल्वे काॅर्पोरेशनकडे सुपुर्द

‘बुलेट ट्रेन’च्या मार्गातील वनजमिनींचा अडथळा दूर; ठाणे-पालघरची ३२४ एकर जमीन रेल्वे काॅर्पोरेशनकडे सुपुर्द

googlenewsNext

नारायण जाधव,लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गातील एका मागोमाग एक अडथळे राज्य सरकारकडून दूर केले जात आहेत. बुलेट ट्रेनच्या मुंबईतील बीकेसी आणि ठाणे स्थानकांसाठीचा जमिनीचा तिढा सोडविल्यानंतर आता सर्वात  मोठी अडचण असलेल्या वनजमिनींचा अडथळाही दूर करण्यात आला आहे. बुलेट ट्रेनचा ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील मार्ग वन जमिनीतून जातो. ती ३२४ एकर २९ गुंठे वन जमीन एकनाथ शिंदे सरकारने आता नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनकडे गुरुवारी सुपूर्द केली आहे.

बुलेट ट्रेनसाठी वनजमीन महाराष्ट्र शासनाने दिल्यानंतर आता नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनचा (एनएचएसआरसीएल) आखणीचा मार्ग सुकर  झाला आहे. ही जमीन कोणत्या भागात आहे, त्यात किती झाडे तोडावी लागणार आहेत, याबाबतचा तपशील  एनएचएसआरसीएलने  आता वृत्तपत्रात प्रसिद्ध करायचा आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यांच्या वेशीवरील तुंगारेश्वर अभयारण्यातून बुलेट ट्रेनचा मार्ग जातो. यामुळे हजारो वृक्षांवर कुऱ्हाड कोसळणार असून, अभयारण्यातील पक्षी, प्राणी यांच्या अस्तित्वावरही गदा येणार आहे. यामुळे ही वन जमीन ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान एनएचएसआरसीएलसमोर होते.

बुलेट ट्रेनसाठी एनएचएसआरसीएलने १३१.३०१९ हेक्टर अर्थात ३२८ एकर २५ गुंठे वन जमीन मागितली होती; मात्र या प्रस्तावाच्या छाननीनंतर राज्याच्या महसूल आणि वन विभागाने १२९.७१९७ हेक्टर अर्थात ३२४ एकर २९ गुंठे वनजमीन देण्यास संमती दिली.

१३५ किलोमीटरचा उन्नत मार्ग 

एनएचएसआरसीएलने यापूर्वीच देशातील समुद्राखालील ७ किलोमीटरच्या बोगद्यासह बीकेसी ते शीळ फाट्यापर्यंतचा २१ किलोमीटर भूमिगत मार्ग बांधण्याचे ६,३९७ कोटी रुपयांचे काम ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शन्सला दिले आहे. तसेच राज्यातील सर्वात लांब असलेला १३५ किलोमीटरच्या उन्नत मार्गाचे कंत्राट एल ॲण्ड टी कंपनीला दिले आहे. याच मार्गासाठी आवश्यक असलेल्या ३२४ एकर वन जमिनीचा अडथळा आता दूर झाला आहे.

२० एकर ९९ गुंठ्यावर खारफुटीचा समावेश

महाराष्ट्र शासनाने गुरुवारी एनएचएसआरसीएलला ३२४ एकर २९ गुंठे वन जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात ८.३९७८ हेक्टर अर्थात २० एकर ९९ गुंठ्यावर खारफुटीचाही समावेश आहे. 
याशिवाय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ०.११३८ हेक्टर, ठाणे जिल्ह्यातील ४९.५३४५ हेक्टर म्हणजेच १२३ एकर ८३ गुंठे आणि पालघर जिल्ह्यातील डहाणूची ७१.६७३६ हेक्टर अर्थात १७९ एकर १९ गुंठे वन जमिनीचा समावेश आहे.

Web Title: Removal of obstruction of forest lands in the path of 'bullet train'; 324 acres of Thane-Palghar land handed over to Railway Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.