नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेरील रस्त्यावर विद्युत दिवे नसल्याने या ठिकाणी रात्री काळोख पसरत होता. त्यामुळे या ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता, तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. ‘लोकमत’ने याबाबत वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते. महापालिकेने वृत्ताची दखल घेत, मुख्यालयाबाहेरील रस्त्यावर विद्युत खांब बसविले असून, काळोख दूर झाला आहे.नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील रस्ते, तलाव, उद्याने, मैदाने आदी ठिकाणी विद्युत खांब बसविण्यात आले आहेत, परंतु महापालिकेच्या मुख्यालयाबाहेरील रस्त्यावर विद्युत खांब बसविण्याचा विसर पडला होता. पामबीच मार्गाशेजारी असलेल्या महापालिका मुख्यालय परिसरात सकाळी आणि सायंकाळी मोठ्या प्रमाणावर नागरिक व्यायामाच्या निमित्ताने येत असतात, परंतु या परिसरात विद्युत दिवे नसल्याने त्यांना अंधाराचा सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला होता. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त वेळोवेळी प्रसिद्ध केले होते. ‘लोकमत’च्या वृत्ताची दाखल घेत, महापालिकने मुख्यालयाबाहेरील रस्त्यावर विद्युत खांब बसविले आहेत.
लोकमत इफेक्टमुख्यालयाबाहेरील रस्त्यावर विद्युत दिवे नसल्याने रात्री या ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असे. याबाबत ‘लोकमतमध्ये बातमी प्रसिध्द करण्यात आली होती याची दखल घेऊन दिवे लावण्यात आले.