मोदीशाही  हटाव, लोकशाही बचाव; पनवेलमध्ये  इंडिया आघाडीच्या वतीने निदर्शने  

By वैभव गायकर | Published: December 22, 2023 05:00 PM2023-12-22T17:00:33+5:302023-12-22T17:00:49+5:30

इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी चौकात निदर्शन केली.

Remove Modi Sharia, Defend Democracy; Demonstrations on behalf of India Alliance in Panvel | मोदीशाही  हटाव, लोकशाही बचाव; पनवेलमध्ये  इंडिया आघाडीच्या वतीने निदर्शने  

मोदीशाही  हटाव, लोकशाही बचाव; पनवेलमध्ये  इंडिया आघाडीच्या वतीने निदर्शने  

पनवेल: हुकूमशाही सरकारने सरकारला प्रश्न विचारले म्हणून 149 खासदारांचे निलंबन केल्याचा आरोप करत दि.22 रोजी पनवेल येथील शिवाजी महाराज चौक या ठिकाणी भाजप सरकारचा जाहीर निषेध इंडिया  आघाडीतर्फे करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.  

देशात भाजपच्या वतीने दडपशाही सुरु आहे.भारताच्या इतिहासात प्रथमच तब्बल 149 खासदारांना निलंबित केल्याची घटना घडत आहे. याविरोधात देशभरात आक्रोष आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधारी भाजप कोणत्याही स्तरावर जात असल्याचा आरोप इंडिया आघाडीने करत पनवेल उरण मधील इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी चौकात निदर्शन केली.

मोदीशाहr हटाव लोकशाही बचाव अशा प्रकारची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.यावेळी  माजी आमदार बाळाराम पाटील,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)गटाचे  बबन पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत,माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, माजी नगरसेवक सतीश पाटील, काँग्रेसचे महेंद्र घरत,सुदाम पाटील, आर सी घरत, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील,माजी नगरसेविका निर्मला म्हात्रे, सुरेख मोहोकर, शेकापचे नारायण घरत, एकनाथ म्हात्रे, विश्वास पेटकर, अवचित राऊत   आघाडीचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी भाजपाविरोधात घोषणा देण्यात आल्या.

Web Title: Remove Modi Sharia, Defend Democracy; Demonstrations on behalf of India Alliance in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल