नेरूळ मलप्रक्रिया केंद्रातील गाळ काढला; नागरिकांची दुर्गंधीपासून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 01:19 AM2020-05-30T01:19:56+5:302020-05-30T01:20:11+5:30
महापालिकेने परिसरात स्वच्छता करण्याची मागणी
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ येथील नवी मुंबई महापालिकेच्या मलनि:सारण प्रक्रिया केंद्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिक दुर्गंधीने त्रस्त होते. महापालिकेच्य माध्यमातून मलप्रक्रिया केंद्रातील गाळ काढण्यात आल्याने स्थानिकांची दुर्गंधीतून सुटका झाली आहे. मलप्रक्रिया केंद्रातील परिसराची नियमित स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
नेरूळ पूर्व आणि पश्चिम भागातीत मलवाहिन्यांतील सांडपाणी नेरूळ सेक्टर २ येथील मलनि:सारण प्रक्रिया केंद्रात सोडण्यात आले आहे. या ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. सदर मलप्रकिया केंद्र जुने झाले असून परिसरातील नागरिकांना दुर्गंधीसारख्या विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. मलप्रकिया केंद्र स्थलांतरणाच्या प्रक्रिया २०१२ मध्ये पूर्ण झाल्या होत्या. या कामाला पालिकेच्या महासभेची मंजुरी मिळून कामदेखील सुरू झाले होते. काम अंतिम टप्प्यात आले असताना खारफुटीचा अडथळा येत असल्याने हे काम रखडले होते. त्यानंतर सदर कामाला पुन्हा मंजुरी मिळाली होती, परंतु ते काम पूर्ण होऊ शकले नाही. सदर केंद्र स्थलांतरित होणार असल्याचे सांगून गेल्या काही वर्षांपासून डागडुजीची कामे करण्यात आलेली नाहीत.
मलप्रक्रिया केंद्रातील गाळ काढण्याकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. मलप्रकिया केंद्रातील गाळाची पातळी वाढल्याने परिसरात दुर्गंधीचे प्रमाणदेखील वाढले आहे. मलनि:सारण केंद्राच्या परिसरात मोकळी जागा मोठ्या प्रमाणावर असून शहरात स्वच्छता अभियान राबविताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जप्त केलेले साहित्य, बॅनर, भंगार वाहने, डेब्रिज टाकण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे. या ठिकाणी सापांचा वावरही वाढला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कोरोना काळात मलनि:सारण केंद्रातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याअनुषंगाने माजी नगरसेविका स्नेहा पालकर यांनी महापालिकेकडे पत्रव्यवहार करून मलनि:सारण केंद्रातील गाळ काढण्याची आणि परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली होती.
च्नवी मुंबई महानगरपालिकेने घटनेची तत्काळ दखल घेत शुक्रवारी २९ मे रोजी मलनि:सारण केंद्रातील गाळ काढण्याचे काम
सुरू के ले आहे. गाळ काढल्याने परिसरातील दुर्गंधीचे प्रमाण कमी होणार असून स्वच्छतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.