दिव्यांगांच्या मार्गातील अडथळे दूर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:38 AM2018-10-30T00:38:42+5:302018-10-30T00:39:08+5:30

शहरातील रस्ते, पदपथ व महापालिकेच्या इमारतीमध्ये दिव्यांगांनाही सहज ये - जा करता यावी यासाठी अडथळामुक्त शहर निर्मितीकडे पालिका लक्ष देत आहे.

Removing obstacles in the path of Divyanagara | दिव्यांगांच्या मार्गातील अडथळे दूर करणार

दिव्यांगांच्या मार्गातील अडथळे दूर करणार

Next

नवी मुंबई : शहरातील रस्ते, पदपथ व महापालिकेच्या इमारतीमध्ये दिव्यांगांनाही सहज ये - जा करता यावी यासाठी अडथळामुक्त शहर निर्मितीकडे पालिका लक्ष देत आहे. दिव्यांगांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त रामास्वामी एन. यांनी दिली आहे.

पालिकेच्या ई.टी.सी. अपंग शिक्षण, प्रशिक्षण, सेवा सुविधा केंद्र व अभियांत्रिकी विभागाच्या सहयोगाने मुख्यालयात अडथळामुक्त चालण्यायोग्य शहराविषयीच्या विशेष वॉकॅबिलिटी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यापुढील काळात प्रत्येक काम करताना ते अडथळामुक्त व चालण्यायोग्य असेल याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. शासनाने याविषयी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तपासणी सूची तयार करण्यात आली असून त्यानुसार काम करावे व कामात सातत्य असावे अशा सूचना यावेळी आयुक्तांनी केल्या.

शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी नवी मुंबई हे आधुनिक शहर अधिक राहण्यायोग्य बनविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. १ ते ३ किमीचे अंतर सर्व नागरिकांना सुलभ रीतीने चालत जाण्यासाठी योग्य व्हावे ही वॉकॅबिलिटी संकल्पनेमागील भूमिका असल्याचे स्पष्ट केले. ई.टी.सी. केंद्र संचालिका वर्षा भगत यांनी एकाच छताखाली सर्व प्रकारच्या व सर्व वयोगटातील दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, प्रशिक्षण देणारे ई.टी.सी. हे देशातील एकमेव केंद्र असल्याचे स्पष्ट केले. मुख्य व्याख्यात्या अनिता अय्यर नारायणन यांनी दिव्यांग व्यक्तींना समाजात वावरताना भासणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष लक्ष देऊन प्रयत्न करण्याची गरज त्यांनी विषद केली. याप्रसंगी
अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील उपस्थित होते.

Web Title: Removing obstacles in the path of Divyanagara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.