रोडपाली परिसराला समस्यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 01:16 AM2020-02-22T01:16:50+5:302020-02-22T01:17:11+5:30
नागरिकांची नाराजी : रस्त्यांसह पदपथांची झाली दुरवस्था
कळंबोली : पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र मांक सातमधील अवस्था अतिशय बिकट आहे. येथे पायाभूत सुविधांचा पूर्णपणे अभाव आहे. रस्त्यांची स्थिती अतिशय दयनीय आहे. गटारे उघडी आहेत तर चालण्यासाठी पदपथ शिल्लक राहिले नाहीत आणि पथदिवे बंद अवस्थेत असतात. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. वारंवार तक्र ारी करूनही सिडकोकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र मांक सातमध्ये रोडपालीचा परिसर येतो. उंच इमारती आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांची घरे या प्रभागात आहेत. कळंबोलीच्या एका टोकाला असलेल्या या प्रभागाकडे सिडकोचे दुर्लक्ष होत आहे. सेक्टर १४, १५ आणि १६ या ठिकाणी अंतर्गत रस्त्यावर डांबर राहिलेले नाही. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मातीचे आणि धुळीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळी नाले कचरा, डेब्रिज आणि मातीने फुल्ल झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात हे नाले तुंबून पाणी रस्त्यावर येते. या कारणाने प्रभाग ७ मधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत. गटारावरील झाकले निघाली आहेत. तसेच त्या ठिकाणचे स्लॅब तुटलेले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना चालता येत नाही. या ठिकाणचे पथदिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी आणि पहाटे रस्त्यावर अंधार दाटलेला असतो. त्यामुळे महिलांना असुरक्षित वाटते. रहिवाशांना खेळण्यासाठी या प्रभागांमध्ये क्र ीडांगणाचा अभाव आहे. पोलीस मुख्यालयाच्या जवळ एका उद्यानाचे काम सुरू आहे. परंतु ते कधी पूर्ण होईल याबाबत प्रश्न विचारला जात आहे. या उद्यानामध्ये चिल्ड्रन पार्क आणि ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राची सोय नाही. याबाबत सिडकोचे कार्यकारी अभियंता मिलिंद म्हात्रे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
प्रभाग क्र मांक सातमध्ये दिसायला टोलेजंग इमारती आहेत. परंतु मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. ही वस्तुस्थिती मान्यच करावी लागेल. यासाठी आम्ही सिडकोकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. तसेच पत्रव्यवहारसुद्धा सुरू असतात. सिडकोने काही कामे हाती घेतली आहेत. त्यामध्ये रोडपालीकरता स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच इतर सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नगरसेवक म्हणून पाठपुरावा करीत आहोत.
- राजेंद्र शर्मा, नगरसेवक, पनवेल महानगरपालिका
जड वाहनांची पार्किंग डोकेदुखी
च्या प्रभागात बेकायदेशीर अवजड वाहनांची पार्किंग ही सर्वात मोठी समस्या आहे. कळंबोली वाहतूक शाखेने एका वर्षामध्ये १७ हजार वाहनांवर कायदेशीर कारवाई केली.
च्त्यांच्याकडून लाखो रु पयांचा दंड वसूल केला. मात्र तरीही रस्त्यावर आणि मोकळ्या भूखंडांवर बेकायदा पार्किंग केली जात आहे. याकरता पदपथ आणि गटारे काही ठिकाणी बुजवून टाकण्यात आली आहेत.
मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई
प्रभाग क्र मांक सातमध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. एका टोकाला आणि हा परिसर उंचावर असल्याने सर्वात शेवटी रोडपालीला पाणी मिळते. तेही कमी दाबाने. त्यामुळे उंच इमारतींमध्ये पाणी वर पोहोचत नाही. या कारणाने वसाहतीमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होत आहे. ऐन पावसाळ्यातही येथील सोसायट्यांना पाणी मिळत नाही.