कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी दिली महापालिकेला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 02:06 AM2017-08-31T02:06:43+5:302017-08-31T02:07:02+5:30
कर्नाटक राज्यातील दावणगेरे महापालिकेच्या महापौरांसह लोकप्रतिनिधींनी महापालिकेला भेट दिली. या वेळी त्यांनी प्रेझेंटेशनद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून पालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली.
नवी मुंबई : कर्नाटक राज्यातील दावणगेरे महापालिकेच्या महापौरांसह लोकप्रतिनिधींनी महापालिकेला भेट दिली. या वेळी त्यांनी प्रेझेंटेशनद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून पालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली. या अभ्यास दौºयातून देशातील उत्तम यंत्रणा बघायला मिळाल्याची भावना कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली.
शहरात यशस्वीरीत्या राबवलेल्या अनेक लोकोपयोगी प्रकल्पांमुळे नवी मुंबई महापालिकेचा नावलौकिक वाढला आहे. यामुळे देशभरातील विविध महापालिकांच्या लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ नवी मुंबईला भेट देत आहे. यानुसार मंगळवारी कर्नाटकातील दावणगेरे महापालिकेच्या लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने नवी मुंबई महापालिकेला भेट दिली. या वेळी दावणगेरे महापालिकेच्या महापौर अनीता मालथेश, महसूल समिती सभापती एस. एस. बसप्पा, स्थायी समिती सभापती दिलशा अहमद, जी. बी. लिंगराजू, एच. बी. गोणप्पा यांच्यासह सुमारे ३० लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महापौर सुधाकर सोनवणे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी त्यांचे स्वागत करत पालिका मुख्यालगत बैठकीतून चर्चा केली.
या वेळी शहर अभियंते मोहन डगावर यांनी प्रेझेंटेशनद्वारे या शिष्टमंडळाला पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली. त्यानंतर प्रत्यक्ष काही प्रकल्पांना भेट देऊनही पाहणी केली. नेरुळ सेक्टर-५० येथील सी टेक तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक मलप्रक्रिया केंद्राचीही पाहणी करून सांडपाण्याच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया जाणून घेतली. महापालिका मुख्यालयाची भव्य इमारत पाहून प्रभावीत झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. तर इतरही सर्वच प्रकल्पांची त्यांनी प्रशंसा करत, या अभ्यासदौºयातून देशातील उत्तम यंत्रणा असलेली महापालिका बघायला मिळाल्याचीही भावना लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली.