शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

स्मार्ट सिटीसाठी नागरी सहभाग आवश्यक

By admin | Published: January 08, 2016 2:17 AM

शहर स्मार्ट बनविण्यासाठी राज्यकर्ते, शासन, प्रशासन आणि शहरवासीयांचा सहभाग मोलाचा ठरतो. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादातूनच

नवी मुंबई : शहर स्मार्ट बनविण्यासाठी राज्यकर्ते, शासन, प्रशासन आणि शहरवासीयांचा सहभाग मोलाचा ठरतो. नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादातूनच शहर स्मार्ट बनते,असे मत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त केले. पत्रकार दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई प्रेसक्लब आणि नवी मुंबई युनियन आॅफ जर्नालिस्ट यांच्या पुढाकाराने आयोजित स्मार्ट सिटी नवी मुंबई:संकल्पना आणि अपेक्षा या परिसंवादात ते बोलत होते. मनातील स्वार्थ, संकुचितपणा, अहंकार दूर ठेवल्यास शहरेच काय देशही स्मार्ट होईल, असा आशावाद महापौरांनी व्यक्त केला. या परिसंवादास प्रमुख वक्ते म्हणून महापालिकेचे शहर अभियंता मोहन डगांवकर, नगररचना सल्लागार सुहास गोखले, केंद्रीय वने-पर्यावरण मंत्रालय समिती सदस्य हितेन सेठी, माहिती-जनसंपर्क महासंचालनालयचे संचालक देवेंद्र भुजबळ, बिल्डर असोसिएशनचे माजी अध्यक्ष देवांग त्रिवेदी उपस्थित होते. शासकीय यंत्रणांनी राबवलेल्या मोहिमांना नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास नवी मुंबई शहर स्मार्ट बनेल, असा विश्वास मोहन डगांवकर यांनी यावेळी व्यक्त केला.तर आपत्तीच्या प्रसंगी पोलीस, अग्निशमन दल, खाजगी स्वयंसेवी संस्थांची मदत जिथे तत्परतेने पोहचू शकते ते शहर स्मार्ट म्हणायला हरकत नाही, असे मत प्रसिध्द वास्तुविशारद हितेन सेठी यांनी मांडले. यावेळी अर्बन प्लॅनिंगचे कन्सल्टन्ट सुहास गोखले, बांधकाम व्यावसायिक देवांग त्रिवेदी व माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनीही स्मार्ट सिटीविषयी आपली मते मांडली. परिसंवादाच्या प्रारंभी नवी मुंबई युनियन आॅफ जर्नालिस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी दोन्ही संघटनांच्या माध्यमातून वर्षभर आयोजित उपक्रमांची माहिती प्रास्ताविकातून दिली. तर नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी सूत्रसंचालन केले. निवडक श्रोत्यांकडून त्यांनी स्मार्ट सिटीबाबतची मते जाणून घेतली. (प्रतिनिधी)