पनवेलच्या महासभेत आयुक्तांवर अ‍ॅट्रॉसिटीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:31 AM2018-03-20T00:31:05+5:302018-03-20T00:31:05+5:30

पनवेल महापालिकेच्या महासभेत आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आयुक्तांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.

The Resolution of Atrocity on the Commissioners at the General Assembly of Panvel | पनवेलच्या महासभेत आयुक्तांवर अ‍ॅट्रॉसिटीचा ठराव

पनवेलच्या महासभेत आयुक्तांवर अ‍ॅट्रॉसिटीचा ठराव

Next

पनवेल : पनवेल महापालिकेच्या महासभेत आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आयुक्तांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे.
दुर्बल घटक व मागासवर्गीय कल्याण निधीचा आयुक्तांनी जाणीवपूर्वक वापर केला नसल्याचा ठपका ठेवत सोमवारी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी हा ठराव सभागृहात मांडला. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही पाठिंबा दर्शवला.
पनवेल महापालिकेची प्रत्येक महासभा गोंधळी ठरली आहे. अनेकदा विरोधक असलेल्या शेकापकडून आयुक्तांच्या बाजूने समर्थन केले जाते. मात्र गेल्या महासभेत आयुक्तांनी अधिकाºयांसह सभात्याग केला आणि सोमवारीही ते अनुपस्थित होते.
दुर्बल घटक व मागासवर्गीय कल्याण निधीची ५ टक्के रक्कम म्हणजेच तब्बल ७ कोटी ३२ लाख रुपये महापालिकेने खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र आयुक्तांनी एकही रुपया खर्च न केल्याने त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीला सत्ताधाºयांसह विरोधकांनीही पाठिंबा दर्शवल्याने पीठासन अधिकारी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी ठराव मंजूर केला.

Web Title: The Resolution of Atrocity on the Commissioners at the General Assembly of Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल