शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आयुक्तांच्या निषेधाचा ठराव

By admin | Published: February 16, 2017 2:20 AM

महापौरांप्रती केलेला शब्दप्रयोग चुकीचा असल्याच्या कारणावरून बुधवारी महासभेत पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात

नवी मुंबई : महापौरांप्रती केलेला शब्दप्रयोग चुकीचा असल्याच्या कारणावरून बुधवारी महासभेत पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात बहुमताने अविश्वासाचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी सांगितले. या वेळी अधिकार नसतानाही आयुक्त ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबवत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.पालिका आयुक्त व महापौर यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. यादवनगर येथील ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमावेळी बदली केलेल्या त्या मुख्याध्यापकाची नियुक्ती महापौर सुधाकर सोनावणे हे शिक्षण मंडळ सभापती असताना झालेली असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रसिद्धी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले होते; परंतु त्या मुख्याध्यापकाची नियुक्ती आपल्या कार्यकाळातली नसल्याने आयुक्तांकडून आपली बदनामी केली जात असल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. बुधवारी झालेल्या महासभेत सभागृह नेते जे. डी. सुतार यांनी यावर चर्चा घडवून आणली. आयुक्तांनी महापौरांवर चिखलफेक केली असल्याचे सांगत त्यांनी निषेध नोंदवला. या वेळी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी आयुक्तांनी प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना महापौरांचा उल्लेख करताना केलेला शब्दप्रयोग चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले. तर संविधानिक पद भूषवताना त्यांनी राज्यघटनेचाही आदर करावा, असा सल्ला दिला. शिवाय हिंमत असेल तर आयुक्तांनी मीच महापालिका चालवतो, असे शासनाला कळवावे, आवश्यकता असल्यास लोकप्रतिनिधी राजीमानाही देतील, असाही टोला मारला; परंतु ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबवण्याचा आयुक्तांना अधिकारच नसल्याचे नगरसेवक संजू वाडे यांनी सभागृहात सांगितले. हा उपक्रम राबवायला सुरुवात झाली, तेव्हाच विरोध करण्याची आवश्यकता होती; परंतु यापुढे तरी त्यांना प्रभागात पाय ठेवू देऊ नये, असा सल्ला त्यांनी नगरसेवकांना दिला. (प्रतिनिधी)