कृत्रिम विसर्जन तलावांनाही नवी मुंबईकरांचा प्रतिसाद

By नामदेव मोरे | Published: September 21, 2023 04:22 PM2023-09-21T16:22:06+5:302023-09-21T16:23:07+5:30

नवी मुंबईमध्ये गणेशोत्सव शांततेमध्ये व सुरळीत पार पाडण्यासाठी महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे.

Response of Navi Mumbaikars to Artificial Immersion Ponds | कृत्रिम विसर्जन तलावांनाही नवी मुंबईकरांचा प्रतिसाद

कृत्रिम विसर्जन तलावांनाही नवी मुंबईकरांचा प्रतिसाद

googlenewsNext

नवी मुंबई : पालिका कार्यक्षेत्रामध्ये दीड दिवसांच्या ९८७१ गणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. मध्यरात्री साडेबारा वाजेपर्यंत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका सुरू होत्या. महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांना ही प्रतिसाद मिळत असून, दिवसभरात २६३५ मूर्तींना या तलावांमध्ये निरोप देण्यात आला.

नवी मुंबईमध्येगणेशोत्सव शांततेमध्ये व सुरळीत पार पाडण्यासाठी महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. २२ नैसर्गिक तलावांसह १४१ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. मुख्य विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले. तराफांची सोय केली आहे. पट्टीचे पोहणारे, अग्निशमन दलाचे जवान, वैद्यकीय पथकेही उपलब्ध करून दिली आहेत. नागरिकांना सूचना देण्यासाठी स्टेज, माईक व इतर सुविधाही दिल्या आहेत. गेल्या वर्षी ९०७७ घरांमध्ये दीड दिवसाच्या गणरायांची प्रतिष्ठापना केली होती. यावर्षी घरगुती व सार्वजनिक मिळून ९८७१ ठिकाणी बाप्पांचे आगमन झाले होते. बुधवारी सायंकाळपासून ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका सुरू करण्यात आल्या. रात्री साडेबारा वाजेपर्यंत मुख्य तलावांमध्ये विसर्जन सुरू होते.

महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर स्वत: सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, परिमंडळ एकचे उपायुक्त साेमनाथ पोटरे, परिमंडळ दोनचे श्रीराम पवार यांनीही विसर्जन स्थळांना भेटी देऊन सर्व व्यवस्थेची पाहणी केली. मुख्य विसर्जन स्थळांवर तराफ्यांची व्यवस्था केली होती. विद्युत व्यवस्था, जनरेटरसह इतर सुविधाही पुरविली आहे.

चौकट
१० टन ९४५ किलो निर्माल्य
महानगरपालिकेने सर्व विसर्जन स्थळावर निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. दीड दिवसांच्या गणेशोत्सवामध्ये १० टन ९४५ किलो निर्माल्य संकलित झाले आहे. हे निर्माल्य महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळी नेण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माल्य संकलनाचे काम सुरू आहे.

चौकट
विभागनिहाय गणेश विसर्जनाचा तपशील
विभाग - मुख्य तलाव - कृत्रिम तलाव
बेलापूर - १९६४ - ३४८
नेरूळ - १००९ - ३६५
तुर्भे - ४०४ - ४५७
कोपरखैरणे - ९१३ - ३८३
घणसोली १२१६ - २४४
ऐरोली - ८६१ - ४०९
दिघा - २११ - ८७

Web Title: Response of Navi Mumbaikars to Artificial Immersion Ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.