शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

नव्या पिढीवर देशाची जबाबदारी; जीवनधारा-लोकमत आयोजित चित्रभारती चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 12:18 AM

ठाण्यासह मुंबई शहराला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला आहे. ही बांधकामे अनधिकृत असली तरी ती गरजेतून निर्माण झाली आहे.

नवी मुंबई : लहान मुले देशाचे भावी नागरिक आहेत. नव्या पिढीवर देशाची जबाबदारी आहे. विविध कारणांमुळे शहरे समस्याग्रस्त बनली आहेत. या परिस्थितीला राज्यकर्ते जबाबदार आहेत. वेळोवेळी नियोजन न झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. या परिस्थितीवर गांभीर्याने मात करण्याची जबाबदारी नव्या पिढीवर येऊन ठेपली आहे, असे प्रतिपादन आमदार गणेश नाईक यांनी वाशी येथे केले.

जीवनधारा आणि ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या चित्रभारती चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा २ फेब्रुवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख आतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, ‘लोकमत’चे सह उपाध्यक्ष विजय शुक्ला, माजी महापौर सागर नाईक उपस्थित होते. देशातील शहरे बकाल झाली आहेत.

ठाण्यासह मुंबई शहराला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला आहे. ही बांधकामे अनधिकृत असली तरी ती गरजेतून निर्माण झाली आहे. गाव-खेड्यातून तसेच विविध प्रांतातून येणारे लोंढे थोपविण्यात राज्यकर्त्यांना अपयश आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात वाढणाऱ्या गर्दीमुळे विमानतळाससुद्धा एसटी स्थानकाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्या वेळी आवश्यक नियोजन न केले गेल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. घरांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत.

प्रामाणिक माणसाला लाखो रुपये खर्चून घर घेणे अशक्य झाले आहे. त्यामुळे अनधिकृत घरांचा पर्याय सुलभ झाला आहे. त्यातूनच प्रमुख शहरांत अनधिकृत बांधकामांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीवर मात करण्याची क्षमता आजच्या तरुण पिढीत आहे. बकाल झालेली शहरे समस्यामुक्त करण्याच्या दृष्टीने नव्या पिढीने विचार करायला हवा, असे मत नाईक यांनी या वेळी व्यक्त केले. या स्पर्धेच्या माध्यमातून मुलांनी रेखाटलेली चित्रे सुबक आणि अत्यंत प्रबोधनकारी असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

मराठी भाषेतील सर्वोच्च खपाचे दैनिक म्हणून ‘लोकमत’चा दबदबा निर्माण झाला आहे. ‘लोकमत’मधून लोकांच्या मतांना स्थान मिळते, म्हणूनच मागील १३ वर्षांपासून चित्रभारती चित्रकला स्पर्धा ‘लोकमत’च्याच सहयोगाने आयोजित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्पर्धेचे मुख्य संयोजक डॉ. संजीव नाईक यांनी प्रास्ताविकातून १३ वर्षांतील उपक्रमाचा आढावा घेतला. प्रत्येक वर्षी स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद हे उपक्रमाचे यश अधोरेखित करणारा असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाला या वेळी प्रीती सिंग, सिंधू नायर, अमित मेढकर, लक्ष्मण पाटील, गुरमित गरहा आदी उपस्थित होते.

अ गटातील (इयत्ता पाचवी ते सातवी) उत्तेजनार्थ

निहाल रेणोसे (फादर अ‍ॅग्नेल, वाशी), तनीषा जाधव (सुशिला देशमुख हायस्कूल, ऐरोली), नाथानी डी. डिक्रुज (फादर अ‍ॅग्नेल, वाशी), जागृती नारायन उदमाळे ( शेतकरी शिक्षण संस्था, घणसोली), श्रेयस विजय कदम (ज्ञानविकास हायस्कूल, कोपरखैरणे), शेख गोवसिया परविन अब्दू गफूर (अंजुमन इस्लाम स्कूल (तुर्भे), पल्लवी विकास चव्हाण (क्रीस्ट अ‍ॅकॅडमी, कोपरखैरणे), सलोनी नीलेश साबळे (श्रीराम विद्यालय, ऐरोली), किसन तारकेश्वर राय (सेंट लॉरेन्स हायस्कूल, वाशी), काव्या विवेक पाटील (अँकरवाला एज्युकेशन अ‍ॅकॅडमी, वाशी), समृद्धी शिवाजी कावळे (सेंट झेविअर्स स्कूल, ऐरोली), कुशल मदन श्रीवास्तव (आयसीएल स्कूल, वाशी), स्पर्श सचिन श्रीष्ठी (डी.ए.व्ही. पब्लिक स्कूल, नेरुळ), मोहम्मद हम्मद हसीम शेख (आर.एफ.नाईक स्कूल (कोपरखैरणे), गजमल साई संदीप (सेंट झेविअर्स, ऐरोली), मनस्वी विठ्ठल पडवी (ज्ञानदीप स्कूल, ऐरोली), निकिता नित्यानंद राय (सेंट झेविअर्स स्कूल, ऐरोली), पीयूष प्रताप सोनवणे (डी.पी.व्ही.एन. स्कूल, सीबीडी), रितुजा विनोद पगारे (विवेकानंद संकुल स्कूल, सानपाडा), भक्तवत्सल संदीप शिंगाडे (विवेकानंद स्कूल, सानपाडा) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

ब गटातील (इयत्ता आठवी ते दहावी) उत्तेजनार्थ

साक्षी शेटये (अमृता विद्यालय, नेरुळ), राजभर खुशबू हरिलाल (रुपेश्री विद्यालय, घणसोली), भारत डी. चौधरी (साई होली फेथ स्कूल, कोपरखैरणे), चतुर्वेदी स्वास्ती संजय (मदर इंडिया मिशन, कोपरखैरणे), नवनीत गणेश सिंग (आयसीएल स्कूल, वाशी), चिन्मय संजय आंब्रे (भारती विद्यापीठ, सीबीडी), अमन सोनी (चार्टेड इंग्लिश स्कूल, ऐरोली), दरेकर इसिता जितेंद्र (भारती विद्यापीठ, सीबीडी), कवर योगिनी नथुराम (सेंट आॅगस्टीन स्कूल, नेरुळ), लावण्या नितीन बोधनकर (विवेकानंद संकुल स्कूल, सानपाडा) , आयेशा इम्तियाज शेख (नवी मुंबई हायस्कूल, वाशी), सोहम विजय आहिरे (सेंट मेरी स्कूल, वाशी) नीलम प्रसाद (पुणे विद्यापीठ भवन, नेरुळ), आदित्यराज अमित सिंग (सरस्वती विद्यालय, ऐरोली), पूजा राधेश्याम बिंद (नवी मुंबई विद्यालय, वाशी), जाधव स्नेहल तानाजी (ऐरोली माध्यमिक स्कूल, ऐरोली), हंसराज महेंद्र हलमुख (रा. फ. नाईक स्कूल, कोपरखैरणे), निखिल राकेश देवळेकर (अमृता विद्यालय, नेरुळ), प्रेरणा महादेव हेगडे) सेंट झेवियर्स स्कूल, ऐरोली), शमिका राजेंद्र दुडुसकर (पुणे विद्याभवन, नेरुळ)

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र