परतीच्या पावसाचा दिलासा
By admin | Published: November 22, 2015 12:49 AM2015-11-22T00:49:08+5:302015-11-22T00:49:08+5:30
गेल्या तीन-चार दिवसांपासून नवी मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल लागली असताना या वातावरणात शनिवारी दुपारी अचानक आलेल्या पावसाने मात्र नागरिकांची चांगलीच
नवी मुंबई : गेल्या तीन-चार दिवसांपासून नवी मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल लागली असताना या वातावरणात शनिवारी दुपारी अचानक आलेल्या पावसाने मात्र नागरिकांची चांगलीच तारांबळ उडविली. सकाळपासूनच शहरातील वातावरणात बदल झाला असून, ऊन-सावलीचा खेळ आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. पावसाने लावलेल्या या हजेरीमुळे चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडाली. सोबत छत्री नसल्याने प्रवाशांना पावसात भिजतच घर गाठावे लागले. दुचाकीस्वार, पादचाऱ्यांनी रस्त्याच्या आडोशाला उभे राहून पावसापासून बचाव
केला.
नवी मुंबईतील सर्वच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचून तळी निर्माण झाली. वादळी वाऱ्याच्या या पावसामुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरल्याचे पाहायला मिळाले. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे तसेच अवकाळी पावसाने साथीच्या आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. पावसाच्या सरींमुळे हवेत आणखीनच गारवा पसरला असून, शहरातील तापमानाचा पारा २५ अंशापर्यंत खालावल्याची नोंद हवामान खात्याने केली. पाऊस पडल्याने थंडी आणखीन वाढण्याची शक्यता आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या हवेतील गारव्याने नवी मुंबईकरांना सुखद दिलासा दिला.