बदलीच्या रागातून मुख्याध्यापकाला मारहाण
By admin | Published: November 17, 2016 05:09 AM2016-11-17T05:09:47+5:302016-11-17T05:09:47+5:30
तालुक्यातील घानवळ आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मधुकर सखाराम शिंदे यांना मारहाण केल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली आहे.
मोखाडा : तालुक्यातील घानवळ आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मधुकर सखाराम शिंदे यांना मारहाण केल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली आहे.
शिपायांच्या बदलीचा राग मनात ठेऊन ही मारहाण केल्याचे समजते मुख्याध्यापक शिंदे यांना अंकुश वळवी यांनी घरी बोलावून शिपाई पवार यांच्या बदलीचा जाब विचारून मारहाण केली.
याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात पंडित सोमा वळवी, सुनीता पंडित वळवी, अंकुश पंडित वळवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पंडित वळवी आणि सुनीता वळवी यांना अटक करण्यात आली आहे.
याचा अधिक तपास पोलिस नाईक पी एस विटकर करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यातील शैक्षणिक विश्वात खळबळ माजली आहे. तसेच तो सर्वत्र चर्चेचा देखील विषय ठरला आहे. (वार्ताहर)