कोकणातील महसूल कार्यालये झाली पेपरलेस; ई ऑफिस प्रणाली शंभर टक्के कार्यान्वित
By कमलाकर कांबळे | Published: February 6, 2024 08:39 PM2024-02-06T20:39:57+5:302024-02-06T20:40:56+5:30
महेंद्र कल्याणकर यांनी घेतला आढावा
नवी मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि कागदविरहित (पेपरलेस) होण्यासाठी राज्यभरातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार कोकण विभागातील सर्व महसूल कार्यालयात शंभर टक्के ई-ऑफिस प्रणाली सुरू केली आहे.
कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी मंगळवारी या कार्यप्रणालीचा आढावा घेतला.
महसूल कार्यालयांमध्ये 'ई-ऑफिस' प्रणालीचा वापर सुरू झाल्यामुळे शासकीय कामकाजात गती येऊन संपूर्णपणे कामकाज पेपरलेस होणार असल्याने कामकाजात अधिक सुलभता आणि पारदर्शकता येईल, असा विश्वासही डॉ. कल्याणकर यांनी व्यक्त केला आहे. 'ई-ऑफिस'च्या वापरामुळे काही प्रकरणांची कागदपत्रे मोबाइलवरदेखील पाहता येणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक व योग्य वापर करून शासकीय कामकाज सुलभ करता येऊ शकते. या ई-ऑफिस प्रणालीचा इतर विभागांनीदेखील अवलंब करावा, अशा सूचना कल्याणकर यांनी यावेळी दिल्या.