महसूलच्या कारभाराचा प्रकल्पग्रस्तांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 03:39 AM2018-12-20T03:39:13+5:302018-12-20T03:39:30+5:30

घर सोडण्याची वेळ : प्रत्यक्ष जागेवर पंचनामे करण्याची मागणी

Revenue Reform Project Afterses Affected | महसूलच्या कारभाराचा प्रकल्पग्रस्तांना फटका

महसूलच्या कारभाराचा प्रकल्पग्रस्तांना फटका

Next

अलिबाग : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीत महसूल विभागाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे न केल्याचा फटका विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांना बसला आहे. कोणताही मोबदला न घेताच आपली घरे सोडून जाण्याची वेळ महसूल विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे पनवेल तालुक्यातील कोंबडभुजे येथील राहणारे अनंता नागा कोळी यांच्यावर आल्याने त्यांनी जिल्हा प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यांनी पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती यांना निवेदन दिले आहे. कोळी यांच्यासारखे अनेक प्रकल्पग्रस्त आजही न्यायाचा प्रतीक्षेत आहेत.

कोंबडभुजे गावातील घरे क्र .३०५-अ व ३०५-ब या दोन्ही घरांवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी बुलडोझर फिरवला जाणार असल्याने कोळी बेघर होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या राहत्या घरांचे तत्काळ पंचनामे करून भूसंपादन कायदा २०१३ नुसार प्रत्यक्ष जागेवर येऊन पंचनामा करून चारपट मोबदल्यासह पुनर्वसन करण्याचे आदेश सिडको, मेट्रो सेंटर १, तसेच पनवेल तहसीलदार यांना करण्याची मागणी अनंता कोळी यांनी केली आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचा नवी मुंबई विमानतळ प्रकल्प रखडण्यामध्ये प्रशासकीय धोरणच जबाबदार असल्याचे कोळी यांनी स्पष्ट केले. सिडकोच्या माध्यमातून केवळ गुगलमार्फत केलेल्या सर्व्हेचा आधार घेऊन सर्वेक्षण करणे हे नुसतेच बेकायदेशीर नाही, तर प्रकल्पग्रस्तांच्या संविधानिक अधिकारावर घातलेला घाला असल्याचा आरोपही त्यांनी निवेदनात केला आहे.
प्रकल्पात बाधित होणाऱ्या आगरी, कोळी, कराडी, दलित, शेतकºयांचे पंचनामे न करताच पुनर्वसन नाकारल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष खदखदत आहे. पुनर्वसन कायदा २०१३ नुसार आमच्या घरांचे तत्काळ पंचनामे करून चारपट मोबदल्यासह कुटुंबाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी कोळी यांनी केली आहे.
दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात बाधित कोळी समाजाबरोबरच इतरही प्रकल्पग्रस्तांचे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामे करून भूसंपादन तसेच पुनर्वसन कायदा २०१३ नुसार पुनर्वसन करावे, असे पत्र विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले आहे.

पुनर्वसन रखडले
च्कोंबडभुजे गावातील घरे क्र. ३०५-अ व ३०५-ब या दोन्ही घरांवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी बुलडोझर फिरवला जाणार असल्याने कोळी बेघर होणार आहेत. तसेच प्रकल्पात बाधित होणाºया शेतकºयांचे पंचनामे न करताच पुनर्वसन रखडले आहे.

Web Title: Revenue Reform Project Afterses Affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.