शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

विधिमंडळ समितीकडून प्रदूषणाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 4:57 AM

तळोजासह नवी मुंबईला भेट : सीईटीपीच्या कामकाजाविषयीही व्यक्त केली नाराजी

तळोजा : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमाच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या सार्वजनिक उपक्र म समितीने तळोजासह, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीचा पाहणी दौरा केला. प्रदूषण वाहनतळासह औद्योगिक वसाहतीमधील सुविधांचीही पाहणी केली. तळोजा सीईटीपीच्या कामकाजाविषयीही नाराजी व्यक्त करण्यात आली.

भाजपा आमदार अनिल बोंडे व राष्ट्रवादीचे रामराव वडकुते यांनी सोमवारी पाताळगंगा एमआयडीसीची पाहणी केल्यानंतर मंगळवारी ठाणे-बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतींना भेट दिली. तळोजातील दीपक फर्टिलायझर या कारखान्याला भेट देत या ठिकाणाची पाहणी केली. तळोजातील ट्रक टर्मिनललाही भेट दिली. वाहनतळाची झालेली दुरवस्था पाहून त्याची स्थिती सुधारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तळोजा औद्योगिक वसाहतीच्या सांडपाणी प्रक्रि या केंद्राची प्रामुख्याने भेट समितीने घेतली व येथील संचालक मंडळाचे म्हणणे ऐकून घेत या प्रकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली. सांडपाणी प्रक्रि या केंद्रातील मरगळ दूर करण्यासाठी हा प्रकल्प एमआयडीसीने चालवणे गरजेचे असल्याचे मत या वेळी आमदारांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सीईटीपीत कोणत्या पद्धतीत पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येते, या बाबत संचालक सतीश शेट्टी यांनी माहिती दिली; पण हरित लवादाच्या कचाट्यात अडकलेल्या सीईटीपीला दहा कोटी दंड भरावा, असे आदेश देण्यात आल्याचे समितीच्या लक्षात आल्यानंतर या सर्व प्रकारची माहिती संचालकांकडून घेऊन वस्तुस्थिती समजून घेतली.तळोजा औद्योगिक परिसरात लहान-मोठे असे एकूण ९७४ कारखाने आहेत, या कारखान्यांतून निघणाऱ्या घातक पाण्यावर प्रक्रि या करण्यासाठी सीईटीपी उभी झाली. मात्र, हरितलवादाच्या म्हणण्यानुसार २०१३ पासून या सीईटीपीने नियम धाब्यावर बसवून जलशुद्धीकरणाच्या नावावर गांभीर्याने हा प्रकल्प चालवला नसल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे हा प्रकल्प एमआयडीसीकडे हस्तांतर करण्यासाठी ही कमिटी प्रस्ताव सादर करणार आहे.सीईटीपीच्या सध्याच्या कामकाजावर पाहणीदौºयातील समितीने शंकाही उपस्थित केली.शासनाकडे अहवाल देणारसार्वजनिक उपक्र म समितीच्या वतीने ठिकठिकाणी पाहणी दौरे सुरू आहेत. अभ्यास समिती त्यांचा अहवाल शासनाला सादर करणार आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीत हा दौरा पार पडला. यामध्ये तळोजाच्या ट्रक टर्मिनलची दुरवस्था व तळोजा सीईटीपीच्या सुधारणेबाबत विचार करण्यात येणार आहे. तसा अहवाल समिती शासन दरबारी सादर करेल. सीईटीपी एमआयडीसीकडे हस्तांतर करण्याच्या दृष्टीने देखील उपाययोजना केल्या जाणार आहेत.प्रदूषणविरहित दिवसतळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कारखान्यांच्या चिमणींमधून दिवस-रात्र धुराचे लोट निघत असतात. रसायनमिश्रित पाणी कासाडी नदीमध्ये सोडण्यात येत असते; परंतु आमदारांची समिती येणार असल्यामुळे बहुतांश कारखान्यांमधून हवेत जाणारे धुराचे लोट व रसायनमिश्रित पाणी बाहेर येत नव्हते. एक दिवस प्रदूषणविरहित गेल्याची प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केली.महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमाच्या व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेली सार्वजनिक उपक्र म समिती यांच्या माध्यमातून हा दौरा घेण्यात आला. पाताळगंगा, तळोजा व महापे या ठिकाणी हा दौरा सुरू आहे. परिसरातील विविध जीवनावश्यक बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही समिती कार्यरत असून तळोजातील ट्रक टर्मिनल व प्रदूषणाच्या बाबत गंभीर दखल घेण्याबाबतचा अहवाल लवकरच समितीच्या माध्यमातून शासन दरबारी मांडला जाईल .- डॉ. अनिल बोंडे,आमदार भाजपा, समिती प्रमुख सार्वजनिक उपक्र म समिती

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईthaneठाणेpollutionप्रदूषण