नवी मुंबई पोलिसांच्या सुधारित आकृतिबंधास मिळाली मान्यता, ५२५६ अधिकारी, कर्मचारी

By नामदेव मोरे | Published: August 29, 2023 12:19 PM2023-08-29T12:19:21+5:302023-08-29T12:19:46+5:30

आयुक्तालयासाठी ५२५६ पदे मंजूर केली असून, ३५ पदे बाह्ययंत्रणांद्वारे घेण्यासाठी मान्यता दिली आहे.

Revised structure of Navi Mumbai Police approved, 5256 officers, staff: services through external system also approved | नवी मुंबई पोलिसांच्या सुधारित आकृतिबंधास मिळाली मान्यता, ५२५६ अधिकारी, कर्मचारी

नवी मुंबई पोलिसांच्या सुधारित आकृतिबंधास मिळाली मान्यता, ५२५६ अधिकारी, कर्मचारी

googlenewsNext

नवी मुंबई : शासनाने राज्यातील दहा पोलिस आयुक्तालयांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधास मंजुरी मिळाली आहे. यामध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचाही समावेश आहे. आयुक्तालयासाठी ५२५६ पदे मंजूर केली असून, ३५ पदे बाह्ययंत्रणांद्वारे घेण्यासाठी मान्यता दिली आहे.

ठाणे आयुक्तालयाचा भाग असलेल्या नवी मुंबईसाठी १९९४ मध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाले. नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल व उरण तालुका असे कार्यक्षेत्र केले. सद्य:स्थितीमध्ये आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र ९५३ चौरस किलोमीटर आहे. यामध्ये १४४ किलोमीटर सागरी किनाऱ्याचा समावेश असून, २० पोलिस ठाण्यांत ते विभागले आहे. याशिवाय गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, अमली पदार्थ विरोधी पथक, अमानवी वाहतूक विरोधी कक्षासह इतर शाखाही आहेत.

 आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा तपशील 
आयुक्त - १, सहपोलिस आयुक्त - १, अपर पोलिस आयुक्त - १, पोलिस उपायुक्त - ६, पोलिस अधीक्षक - १, उपअधीक्षक - २, सहायक आयुक्त - ११, निरीक्षक - ८६, राखीव निरीक्षक - १, सहायक पोलिस निरीक्षक - २०२, उपनिरीक्षक - २४१, राखीव उपनिरीक्षक - २, सहायक पोलिस उपनिरीक्षक - २८१, हवालदार - १४८८, शिपाई - २७३७, उपनिरीक्षक चालक - १, हवालदार चालक - ४, शिपाई चालक - ११३, प्रशासकीय अधिकारी - १, स्वीय सहायक - १, उच्चश्रेणी लघुलेखक - २, निम्नश्रेणी लघुलेखक - २, कार्यालय अधीक्षक - १, लेखा अधिकारी १, सहायक लेखा अधिकारी १, स्थापत्य अभियंता १, प्रमुख लिपिक ८, वरिष्ठ श्रेणी लिपिक १५, कनिष्ठ श्रेणी लिपिक ४४

बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा 
कार्यालयीन शिपाई - १५, मेस मॅनेजर १, सफाई कामगार १४, शिंपी १, मुख्य आचारी १, सहायक आचारी १, भोजनालय सेवक १, मेस सर्व्हंट १.

शहरातील पोलिस स्टेशन पुढीलप्रमाणे
वाशी, एपीएमसी, कोपरखैरणे, रबाळे, रबाळे एमआयडीसी, तुर्भे एमआयडीसी, सानपाडा, नेरूळ, एनआरआय, सीबीडी बेलापूर, खारघर, तळोजा, कळंबोली, खांदेश्वर, कामोठे, पनवेल शहर, पनवेल तालुका, उरण, न्हावा शेवा, मोरा सागरी.

Web Title: Revised structure of Navi Mumbai Police approved, 5256 officers, staff: services through external system also approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस