पुन्हा पाहा जगातील सात आश्चर्य, वंडर पार्क पर्यटकांच्या सेवेत दाखल
By नारायण जाधव | Published: May 31, 2023 08:34 PM2023-05-31T20:34:04+5:302023-05-31T20:34:50+5:30
नवी मुंबई : महामुंबईतील पर्यटकांचे वंडर पार्क हे नवी मुंबईत ३० एकरावर पसरलेले एक लोकप्रिय आकर्षण बनले आहे. यामध्ये ...
नवी मुंबई : महामुंबईतील पर्यटकांचे वंडर पार्क हे नवी मुंबईत ३० एकरावर पसरलेले एक लोकप्रिय आकर्षण बनले आहे. यामध्ये जगातील सात आश्चर्यांच्या लघु प्रतिकृती साकारल्या आहेत. नूतनीकरणानंतर ते पुन्हा एकदा पर्यटकाच्या सेवेत दाखल झाले आहे.
आता त्याचे नूतनीकरण केले असून आता नव्याने म्युझिकल फाउंटन लेझर शोसहित, ऑडिओ व्ह्युजअल यंत्रणा, तलावांची दुरुस्ती, वॉक वेची सुधारणा, नव्याने विविध खेळांच्या साहित्य तसेच खेळण्यांखालील रबर मॅट बदलून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह प्रवेशद्वारावर बायोमॅट्रीक मशीन बसविले आहेत शिवाय नवीन विद्युत दिवे, उद्यानात आकर्षक कारंजे बसविली असून यावर २३ कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्चून त्याचा मेकओव्हर केला आहे.
ज्या सात आश्चर्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत, त्यामध्ये ताजमहाल (आग्रा), क्रिस्टो रेडेंटर (रिओ डी जानेरो), कोलोसियम (इटली), माचू पिचू (पेरू), पेट्रा-अल खजनेह (जॉर्डन), चीनची ग्रेट वॉल आणि चिचेन इत्झा (मेक्सिको) यांचा समावेश आहे. याशिवाय, मनोरंजन पार्कमध्ये १००० लोक बसू शकतील, असे ॲम्फीथिएटर, सायकलिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक ,घोडा-कार्ट राईडदेखील आहे.