माठांच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ

By admin | Published: April 10, 2017 06:03 AM2017-04-10T06:03:58+5:302017-04-10T06:03:58+5:30

सर्वत्रच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे माठांना मागणी वाढली असून यामुळे

Rice prices increase 20 to 25 percent | माठांच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ

माठांच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ

Next

नेरळ : सर्वत्रच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे माठांना मागणी वाढली असून यामुळे सर्वसामान्यांचे थंड पाणीही महाग झाले आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण व शहरी भागात माठाच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. सध्या माठाच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
उन्हामध्ये घशाची कोरड घालविण्यासाठी थंड पाणी पिण्यावर भर असतो. फ्रीजच्या पाण्यामुळे घशाला त्रास होत असल्याने माठातील पाणी पिण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यामुळे अनेक जण घरात फ्रीज असूनही रांजण लहान-मोठ्या माठातील पाणी पित असतात. माठाची बाजारात मोठ्या प्रमाणात विक्र ी होताना दिसत आहे. त्यामुळे उन्हामध्ये थंड पाणी मिळावे यासाठी सर्वच मंडळी माठ खरेदी करतात. एकेकाळी कुंभारवाड्यात जाऊन माठ खरेदी करावे लागत होते, परंतु आता माठ विक्रे ते रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली फिरून माठांची विक्र ी करत असल्याचे दिसत आहेत. रोजंदारीवर काम करून जीवन जगणाऱ्या मजुरांना कमी हजेरी मिळते. त्यामुळे माठ खरेदी करण्यासाठी एक दिवसाची मजुरी द्यावी लागत असल्याचे कष्टकरी नागरिक सांगतात. सध्या नेरळ, कर्जत, कशेळे, कडाव, बाजारपेठेत लाल आणि काळ्या रंगाचे माठ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच माठांना आकर्षक डिझाईनही केले असून तोट्या बसविलेले माठही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आकर्षक पद्धतीच्या माठाला ग्राहकांची विशेष पसंती आहे. लहान व कमी भाजलेले माठ कमी मिळतात, परंतु त्यांचा टिकाऊपणा खात्रीशीर नसल्यामुळे महागडे माठ खरेदी करण्यासाठी ग्राहक पसंती देत आहेत, असे कुंभार सांगतात. कच्च्या मालाबरोबर इतर वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. लाल माती, पोयटा माती, भाजणीचा सर्व खर्च आणि माठ तयार करण्यासाठी लागणारे मजूर त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा माठांच्या किमतीमध्ये वाढ करावी लागली असल्याचे कुंभाराने सांगितले.(वार्ताहर)

खरेदीसाठी गर्दी
माठ विकण्याचा हंगाम ठरावीक काळापुरताच म्हणजे उन्हाळ्यापुरातच मर्यादित असतो. त्यामुळे थोड्या दिवसात जास्त माठ तयार करावे लागतात. सध्या लहान माठांच्या किमती १०० रुपयांपासून पुढे आहेत. यावर्षी उन्हाचा तडाखा वाढल्याने माठ खरेदीसाठी गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी माठांची किंमत वाढ झाली असली तरी विक्र ीही दुपटीने वाढली आहे. सध्या बाजारात १०० , १५०, २००, २५०, ३०० रु पयांपर्यंत माठ मिळत असल्याचे माठ व्यावसायिकाने सांगितले.

Web Title: Rice prices increase 20 to 25 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.