रिक्षा दुकानासमोर लावल्याने स्क्रू ड्रायव्हरने भोसकून चालकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2023 08:52 AM2023-08-09T08:52:12+5:302023-08-09T08:52:22+5:30

तुर्भे येथील घटना : परिसरात तणाव

Rickshaw driver killed by stabbing with a screwdriver after parking it in front of a shop | रिक्षा दुकानासमोर लावल्याने स्क्रू ड्रायव्हरने भोसकून चालकाची हत्या

रिक्षा दुकानासमोर लावल्याने स्क्रू ड्रायव्हरने भोसकून चालकाची हत्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : रिक्षा दुकानासमोर उभी केल्यावरून झालेल्या वादातून रिक्षाचालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी तुर्भे स्टोअर येथे घडली. रिक्षा चालकाच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर घुसवून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.  हत्येनंतर येथे तणाव निर्माण झाला.

हत्या केल्यानंतर भोसकणाऱ्याने स्वत: पोलिस ठाणे गाठले आणि स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले. मात्र, या घटनेमुळे मृत रिक्षाचालकाच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करत ठिय्या मांडला होता. त्यानंतर येथे तणावाचे वातावरण होते. अखेर पोलिसांनी त्यांची समजूत काढून परिस्थिती हाताळली.

नातेवाइकांनी मांडला ठिय्या
n या घटनेमुळे हत्या करण्यात आलेल्या दिनेश चव्हाण (३६) याचे नातेवाईक आणि ओळखीच्यांनी आक्रोश व्यक्त करून मारेकरू मौर्या याच्यावर कठोर कारवाईची मागणी करून घटनास्थळी ठिय्या मांडला होता. यामुळे तणाव निर्माण झाल्याने परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. 
n मारेकरूच्या कुटुंबीयांना त्या ठिकाणावरून पोलिसांनी सुरक्षेत हलवले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी जमावाची समजूत काढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. तर काही नागरिकांनी माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यादेखील कार्यालयात जाऊन मृत दिनेश यांच्या कुटुंबीयांना आधार देण्याची मागणी केली.

Web Title: Rickshaw driver killed by stabbing with a screwdriver after parking it in front of a shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.