रिक्षाचालकाने परत केले दीड लाख

By admin | Published: July 12, 2016 02:15 AM2016-07-12T02:15:25+5:302016-07-12T02:15:25+5:30

रिक्षाचालक प्रभाकर मोरे यांच्या प्रामाणिकपणामुळे कृष्णा गोसावी यांचे दीड लाख रुपये त्यांना परत मिळाले. दरमहा १० हजार रुपये कमाई असलेल्या मोरे यांच्या प्रामाणिक वृत्तीचे कौतुक होत आहे.

Rickshaw driver returned 1.5 million | रिक्षाचालकाने परत केले दीड लाख

रिक्षाचालकाने परत केले दीड लाख

Next

डोंबिवली : रिक्षाचालक प्रभाकर मोरे यांच्या प्रामाणिकपणामुळे कृष्णा गोसावी यांचे दीड लाख रुपये त्यांना परत मिळाले. दरमहा १० हजार रुपये कमाई असलेल्या मोरे यांच्या प्रामाणिक वृत्तीचे कौतुक होत आहे.
मोरे यांच्या रिक्षातील एक प्रवासी बॅग विसरून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ती बॅग न उघडता थेट अंबिकानगरचे नगरसेवक महेश पाटील यांच्या कार्यालयात आणून दिली. ही बॅग कृष्णा गोसावी यांची असल्याचे त्यामधील कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. त्या बॅगेत दीड लाख रुपयांची रोख रक्कम होती.
महेश पाटील यांनी खातरजमा करून गोसावी यांना बोलावून घेतले व डोंबिवलीतील पोलीसमित्रांसमक्ष बॅग सुपूर्द केली. मोरे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा सत्कार केला.
गोसावी यांनी नवीन घर घेतले असून त्याचा हप्ता भरण्यासाठी ते सागर्लीहून दावडीला हे दीड लाख
रु पये घेऊन निघाले होते. मात्र, रिक्षात पैशांची बॅग विसरल्यामुळे ते दु:खी झाले होते. सर्व रक्कम परत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. (प्रतिनिधी)

Web Title: Rickshaw driver returned 1.5 million

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.