महावितरणच्या खुल्या डीपींमुळे अपघातांचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 10:47 PM2019-12-08T22:47:58+5:302019-12-08T22:48:25+5:30

शहरातील पदपथांवरील खुल्या डीपींच्या दुरुस्तीकडे महावितरणचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

Risk of accident due to open DPs | महावितरणच्या खुल्या डीपींमुळे अपघातांचा धोका

महावितरणच्या खुल्या डीपींमुळे अपघातांचा धोका

Next

नवी मुंबई : शहरातील पदपथांवरील खुल्या डीपींच्या दुरुस्तीकडे महावितरणचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे सतत दुर्घटना होत असून, त्यामध्ये अनेकांचे प्राणही गेले आहेत, तर पदपथांवरील या डीपींमुळे पादचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे.

महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात जागोजागी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. सर्वाधिक गैरसोय खुल्या केबल्स व पदपथांवरील डीपी यांच्यामुळे होत शॉक लागून आजवर अनेकांचा मृत्यूही झालेला आहे. तर कित्येक जण जखमी झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी न बाळगता महावितरणची कामे केली जात आहेत. अशाच प्रकारातून नुकतेच कोपरखैरणेत रस्त्यावरील वायरचा स्फोट होऊन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली होती. तर घणसोलीत एका घरासमोर वीज वाहिनी पेटल्याने तिथे खेळणारी लहान मुलगी जखमी झाली होती.अशा अनेक घटना मागील काही वर्षांत घडल्या आहेत. यामुळे पदपथांवरील खुल्या डीपी तसेच निष्काळजी पणे रस्त्यावर व इतरत्र पडलेल्या वीजवाहिन्या जीवघेण्या ठरत आहेत. सद्यस्थितीला शहरातील प्रत्येक नोडमध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे.

पुढील चार महिन्यांत महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींकडून प्रभागातील रस्ते, पदपथ, गटारे आदीच्या दुरुस्तीकामावर जोर दिला आहे. या कामांमध्येही महावितरणच्या वायरींचा अडथळा ठरत आहे. गटारांमधून वायरी टाकलेल्या असल्याने गटारांचे खोदकाम करताना वायर तुटल्यास कामगारांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे.

प्रत्येक खोदकामा वेळी वीज वाहिन्या तुटण्याचे प्रकार घडून सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचेही प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. बहुतांश ठिकाणी बैठ्या चाळीतील अथवा रो-हाउसच्या दारातच या विद्युत डीपी बसवण्यात आल्या आहेत. यामुळे घरासमोर खेळणाºया लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. यासंदर्भात अनेकांनी तक्रारीही केल्या आहेत; परंतु नागरिकांच्या समस्या सोडवण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

शॉर्ट सर्किट होण्याचे प्रकार वाढले

महावितरणमुळे भेडसावणाºया या समस्यांमध्ये भविष्यात अधिकच वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. दाब वाढल्याने अथवा खोदकामात वीजवाहिन्या तुटल्यास त्या ठिकाणी जोड लावून महावितरणकडून वीजपुरवठा पूर्ववत केला जात आहे. मात्र, काही ठिकाणी सातत्याने वाहिन्या तुटल्याचे प्रकार घडत असल्याने अवघ्या ५० ते १०० मीटरच्या वाहिनीला तीनपेक्षा जास्त जोड लावण्यात आले आहेत. हे जोड उघड्यावर धोकादायक स्थितीत ठेवण्यात आलेले असल्याने त्यामध्ये पाणी जाऊन अथवा उन्हाळ्यात उष्णतेमुळे त्या ठिकाणी आग लागण्याचेही प्रकार घडत आहेत. यानंतरही महावितरणकडून संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य घेतले जात नसल्याचे सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Risk of accident due to open DPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.