शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था

By admin | Published: May 10, 2016 2:05 AM

कर्जत तालुक्यात ग्रामीण भागातून तालुक्याला जोडणारे व ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवरील डांबर उडून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे

नेरळ : कर्जत तालुक्यात ग्रामीण भागातून तालुक्याला जोडणारे व ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवरील डांबर उडून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. अशा रस्त्यांवरून प्रवास करताना जनता हैराण झाली आहे. अनेक रस्त्यांची डागडुजी करूनही पुन्हा रस्ते जैसे थे आहेत. अनेक रस्त्यांची १५ ते २० वर्षांपासून दुरु स्ती न केल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. परंतु बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींना ग्रामीण भागातील जनतेचे हाल दिसत नाहीत का, असा प्रश्न वाहनचालक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.तालुक्यातील नेरळ-कळंब, कळंब-बोरगाव, वारे-कुरु ंग-ताडवाडी, ओलमण-पेंढरी, पोशीर-माले, दहीवली-देवपाडा, नेरळ-गूढवण, सावळेफाटा ते हेदवली, मोहिली-बीड, मिरचोली-कडाव, वडवली-पाली-भुतीवली, बेकरे, बोर्ले फाटा ते आंबिवली अशा अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी जंगलभाग असल्याने या खराब रस्त्यावरील चढ-उतार करणे वाहनचालक व प्रवाशांना त्रास दायक ठरत आहे. परंतु अशा या खराब रस्त्यांकडे लक्ष देण्यास जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळ मिळत नाही. आजच्या स्थितीत तालुक्यातील सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट आहे.अनेक रस्त्यांवर डांबरीकरण करण्याऐवजी लाल मातीचा भराव टाकण्यात आला असून, उन्हात अनेक रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरत आहे. त्याचा मोठा त्रास प्रवाशांना होत आहे. तसेच काही रस्त्यांवर नुसती खाडीच शिल्लक राहिल्याने हा प्रवास खडतर झाला आहे. डागडुजी आणि नवीन रस्त्यांसाठी बांधकाम विभागाने कोट्यवधी रु पये खर्च केले. परंतु ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या छुप्या दोस्तीमुळे शासनाचे कोट्यवधी रु पये खर्च करून रस्त्यांची अवस्था सहा महिने व वर्षाने जैसे थे होते. कोट्यवधींच्या कामांना लाखो रु पयांची मलमपट्टी केली जाते. मग याला जबाबदार कोण? यात ठेकेदांची मनमानी सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीत मतांची झोळी पसविणाऱ्या नेत्यांनी याकडे लक्ष द्यावे, असे कर्जतकरांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात तर मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहत असल्याने त्याचे तर खूपच हाल होत आहेत. या खराब रस्त्यांमुळे अनेक भागांतील एसटी सेवा बंद पडल्याने तीन ते चार किमीची पायपीट करावी लागत आहे. याचा त्रास विद्यार्थ्यांनाही होत आहे. त्यामुळे यावर्षी तरी पावसाळ्याच्या आत अनेक नादुस्त रस्ते चांगल्या दर्जाचे करावे अशी मागणी होत आहे.जिल्ह्यात सुमारे आठ हजार एकर लांबी जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची असून, त्या रस्त्यांसाठी हजारो कोटी रुपये बजेट लागेल. परंतु जिल्हा परिषदेचे बजेट १०० कोटींचे आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवर जिल्हा परिषद जास्तीत जास्त पाच ते १० कोटी रुपये खर्च करू शकते. त्यामुळे राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात जे जिल्हा परिषदेचे रस्ते आहेत, ते एकूण लांबीच्या २५ टक्के दरवर्षी नवीन कसे होतील याची बजेटमध्ये तरतूद करणे गरजेचे आहे.-सुदाम पेमारे, जिल्हा परिषद सदस्यखरे म्हणजे हे रस्ते त्या त्या भागातील विकासाची नाडी आहेत. हे रस्ते जर चांगल्या दर्जाचे असतील तर तालुक्यात विकासाची संपत्ती मिळू शकते. परंतु याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. जर हे रस्ते चांगल्या दर्जाचे झाले तर ग्रामीण भागाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही- भरत भगत, माजी तालुकाप्रमुख शिवसेना