पनवेलच्या आर्थिक विकास केंद्राचा मार्ग खडतर, एमएमआरडीएचा प्रकल्प, इस्रोच्या परवानगीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 06:30 AM2020-08-30T06:30:27+5:302020-08-30T06:34:56+5:30

सदर जागा घेण्याआधी एमएमआरडीएला इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि बीपीसीएल यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. हे दोन्ही अडसर दूर झाल्यानंतर पनवेलचे हे आर्थिक विकास केंद्र स्थापनेचा मार्ग सुकर होणार आहे.

Road to Panvel Economic Development Center is tough, MMRDA project, ISRO permission required | पनवेलच्या आर्थिक विकास केंद्राचा मार्ग खडतर, एमएमआरडीएचा प्रकल्प, इस्रोच्या परवानगीची गरज

पनवेलच्या आर्थिक विकास केंद्राचा मार्ग खडतर, एमएमआरडीएचा प्रकल्प, इस्रोच्या परवानगीची गरज

Next

 - नारायण जाधव
ठाणे : मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जागा संपत आल्याने याच धर्तीवर एमएमआरडीएने पनवेलनजीक हिंदुस्थान आॅर्गेनिक केमिकल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या ४३१ एकर जागेवर नवे विकासकेंद्र स्थापनेचा निर्णय घेतला आहे. २०१९-२० च्या रेडीरेकनर दरानुसार ९६३ कोटी ३० लाख १३ हजार ६०० रुपयांना ही जागा जैसे थे तत्त्वावर घेण्यास एमएमआरडीएने मान्यता दिली आहे.

सदर जागा घेण्याआधी एमएमआरडीएला इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि बीपीसीएल यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. हे दोन्ही अडसर दूर झाल्यानंतर पनवेलचे हे आर्थिक विकास केंद्र स्थापनेचा मार्ग सुकर होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील पराडे, वासंबे, आंबिवली-तुंगारतन आणि पनवेल तालुक्यातील तुराडे, पोसरी, देवळोली, सावळे व दापिवली या गावांतील १०१२ एकर जागेवर एचओसीएल कंपनी होती. मात्र, ती अवसायनात निघाल्यानंतर तिची १०१२ एकर जागा बीपीसीएल आणि २० एकर जागा इस्रोने केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने घेतली.
सध्या कंपनीकडे २६८.४५५ एकर जागा शिल्लक आहे. बीपीसीएलने नकार दिल्यास त्यांच्यासाठीची उर्वरित १५५ व ९० एकर जागा नव्या विकास केंद्रासाठी विकत घेण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. ही जागा औद्योगिक असल्याने बीपीसीएल आणि इस्रोच्या परवानगीची गरज भासणार आहे.

हे आहे एचओसीएलच्या जागेचे महत्त्व
एमएमआरडीएच्या मालकीच्या मुंबईतील बीकेसीतील जागा आता संपत आली आहे. प्राधिकरणाने महानगर प्रदेशात अब्जावधी रुपयांचे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार आहे. त्यामुळे पनवेलच्या या जागेवर विकास केंद्र स्थापून त्याचे भूखंड विकून निधी उभारण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. एचओसीएलची जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गासह मुंबई-पुणे दु्रतगती मार्गापासून ती जवळ असून या भागात रिस-मोहपाडा ही नगरपालिका प्रस्तावित आहे. जेएनपीटी बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नैना क्षेत्राला लागून ती आहे. तळोजा, रसायनी या औद्योगिक वसाहती जवळ आहेत. एचओसीएलची पनवेल शहराला लागून निवासी वसाहत असून तिचा एमएमआरडीएच्या आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी वापर करू शकते. शिवाय पराडे, तालुका खालापूर येथील तीन मजली विश्रामगृहात कार्यालय सुरू करणेही सोपे होणार आहे. नियोजित पनवेल-पेण लोकल येथूनच जाणार आहे.

Web Title: Road to Panvel Economic Development Center is tough, MMRDA project, ISRO permission required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल