स्वच्छ पर्यटन, आरोग्यदायी पर्यटनासाठी रस्ते सहल; नवी मुंबई प्रेस क्लबचा पुढाकार

By नारायण जाधव | Published: September 26, 2022 06:49 PM2022-09-26T18:49:53+5:302022-09-26T18:50:50+5:30

जागतिक पर्यटन दिनी अर्थात २७ सप्टेंबर रोजी ही सहल निघणार आहे.

road trips for clean tourism healthy tourism initiative of navi mumbai press club | स्वच्छ पर्यटन, आरोग्यदायी पर्यटनासाठी रस्ते सहल; नवी मुंबई प्रेस क्लबचा पुढाकार

स्वच्छ पर्यटन, आरोग्यदायी पर्यटनासाठी रस्ते सहल; नवी मुंबई प्रेस क्लबचा पुढाकार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी मुंबई - देशातील अनेक पर्यटनस्थळे दुर्लक्षित झाली आहेत, अशा पर्यटनस्थळांची जगाला ओळख व्हावी व प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता राखून नागरिकांना आरोग्यदायी पर्यटन करता यावे ही संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून नवी मुंबई प्रेस क्लबने स्वच्छ पर्यटन, आरोग्यदायी पर्यटन हा संदेश प्रसारासाठी नवी मुंबई ते हंपी-बदामी-चिकमंगलूर- हडेबडी-गोवा अशी रस्तेमार्गे अभ्यास सहल आयोजित केली आहे.  

जागतिक पर्यटन दिनी अर्थात २७ सप्टेंबर रोजी ही सहल निघणार आहे. यंदाचा जागतिक पर्यटन दिन हा पर्यटन मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतून साजरा केला जात आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यावर्षीही 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करत असून यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) द्वारे सन 2022 करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य ‘पुनर्विचारात्मक पर्यटन’ (Rethinking Tourism) हे घोषित केले आहे.

या वर्षी इंडोनेशियातील बाली येथे 27 सप्टेंबर रोजी अधिकृत जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाणार आहे.  देशाच्या विकासात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांना देश विदेशातील अधिकाअधिक पर्यटकांनी भेट देऊन पर्यटन विकासाला मोलाची साथ द्यावी, असे आवाहन नवी मुंबई प्रेस क्लबने या निमित्ताने केले आहे. 

नवी मुंबई शहर व्हावे टूरिस्ट सिटी

नवी मुंबई शहर हे देशातील एक सुनियोजित शहर आहे. येथे बेलापूर किल्लासह गोवर्धनी माता मंदीर, पावणेश्वर मंदीरापासून सिडकोने विकसित केलेला वाशीचा सी शेअर, बेलापूर येथील नियोजित महिना, बंद डंम्पिग ग्राऊंडवर कोपरखैरणे येथे फुलविलेली हिरवळ, ऐरोलीतील महाराष्ट्र सरकारचे वनपर्यटन केंद्र, फ्लेमिंगों सफर आणि देशातील एकमेव फ्लेमिंगो सिटी ही नवी मुंबईची खरी ओळख आहे. गवळीदेव, पांडवकडा धबधबा, चिरनेरचा महागणपती, या सर्वांना नवी मुंबई महापालिका, सिडकोसह महाराष्ट्र सरकारने टुरिस्ट सिटी म्हणून विकसित करावे, अशी नवी मुंबई प्रेस क्लबची मागणी आहे


 

Web Title: road trips for clean tourism healthy tourism initiative of navi mumbai press club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.