रस्ता रुंदीकरणाच्या कामाला युद्धपातळीवर सुरु वात
By admin | Published: January 26, 2017 03:27 AM2017-01-26T03:27:58+5:302017-01-26T03:27:58+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी चौथे टर्मिनस आदींची कामे भविष्यात पूर्ण होणार आहेत. या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग ४ बी,३४८, ३४८ ए , ५५४ या मार्गावर मोठ्या प्रमाणात
वैभव गायकर / पनवेल
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी चौथे टर्मिनस आदींची कामे भविष्यात पूर्ण होणार आहेत. या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग ४ बी,३४८, ३४८ ए , ५५४ या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढणार आहे. त्या दृष्टीने नियोजन करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या सर्व महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे हाती घेतली आहेत. या कामांना सुरु वात झाली असून चार टप्प्यात ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. याकरिता एकूण २०५१ कोटी रु पये एवढा खर्च येणार आहे.
६ ते ८ पदरी हा महामार्ग असणार आहे. या रस्त्यासह दोन्ही बाजूना समांतर सेवा रस्ते देखील उभारले जाणार आहेत. पळस्पे ते जेएनपीटी, पनवेल ते उरण, एनएमएमसी सर्कल ते गव्हाण फाटा, चिंचपाडा जंक्शन ते कळंबोली आदी मार्गावर हे रस्ते तयार केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या चारही टप्प्यात एकूण ३ उड्डाणपूल, १२ लहान पूल, ३ मोठे पूल उभारले जाणार आहेत. वाहतुकीची सर्वात जास्त वर्दळ असलेल्या करळ फाटा येथे सुमारे ५३९ कोटी रु पये खर्च करून मोठा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. विदेशाच्या धर्तीवर उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलासारखे हे उड्डाणपूल असणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविता येणार असून अपघातांचे प्रमाण देखील कमी होईल. भारतामध्ये असलेल्या राष्ट्रीय महामार्गांपैकी सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग पनवेलमध्ये आहे. ५८४ असा महामार्गाचा क्र मांक आहे. चिंचपाडा जंक्शन ते कळंबोली हा केवळ ४.७ किमीचा महामार्ग आहे. ४१४ कोटी
रु पये खर्चून हा महामार्ग देखील विकसित केला जाणार आहे. सध्या या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जेएनपीटी बंदर तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे पनवेलसह संपूर्ण नवी मुंबई शहर हे देशातील व्यस्त शहरामधील एक होणार आहे. साहजिकच वाहतुकीवर याचा सर्वात मोठा परिणाम होणार आहे. त्याकरिताच ही बांधणी करण्यात येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम लवकरच जोर धरणार आहे. तसेच जेएनपीटी चौथ्या टर्मिनसचे काम २०१७ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर या रस्त्यावरील वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
या चारही टप्प्याचे काम २०२१ पर्यंत पूर्ण होईल. जे. कुमार, जे.एम.म्हात्रे प्रायव्हेट लिमिटेड, अशोक बिल्डकॉम लिमिटेड आदी कंपन्यांना या महामार्गाच्या उभारणीचे काम देण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांच्या वतीने पाचव्या टप्प्याचेही काम सुरु केले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीच्या वेळी दोन प्रवेशिका तयार करण्यात येणार आहेत. या प्रवेशिका तयार करण्यासाठी सर्व्हेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरुवात केली आहे. लवकरच टेंडर प्रक्रि या पूर्ण करून या कामालाही सुरु वात करण्यात येणार आहे.