शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
7
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
8
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
9
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
10
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
11
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
12
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
14
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
16
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
17
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
18
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
19
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
20
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."

रस्ता रुंदीकरणाच्या कामाला युद्धपातळीवर सुरु वात

By admin | Published: January 26, 2017 3:27 AM

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी चौथे टर्मिनस आदींची कामे भविष्यात पूर्ण होणार आहेत. या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग ४ बी,३४८, ३४८ ए , ५५४ या मार्गावर मोठ्या प्रमाणात

वैभव गायकर / पनवेलनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी चौथे टर्मिनस आदींची कामे भविष्यात पूर्ण होणार आहेत. या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग ४ बी,३४८, ३४८ ए , ५५४ या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढणार आहे. त्या दृष्टीने नियोजन करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या सर्व महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे हाती घेतली आहेत. या कामांना सुरु वात झाली असून चार टप्प्यात ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. याकरिता एकूण २०५१ कोटी रु पये एवढा खर्च येणार आहे. ६ ते ८ पदरी हा महामार्ग असणार आहे. या रस्त्यासह दोन्ही बाजूना समांतर सेवा रस्ते देखील उभारले जाणार आहेत. पळस्पे ते जेएनपीटी, पनवेल ते उरण, एनएमएमसी सर्कल ते गव्हाण फाटा, चिंचपाडा जंक्शन ते कळंबोली आदी मार्गावर हे रस्ते तयार केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या चारही टप्प्यात एकूण ३ उड्डाणपूल, १२ लहान पूल, ३ मोठे पूल उभारले जाणार आहेत. वाहतुकीची सर्वात जास्त वर्दळ असलेल्या करळ फाटा येथे सुमारे ५३९ कोटी रु पये खर्च करून मोठा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. विदेशाच्या धर्तीवर उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलासारखे हे उड्डाणपूल असणार आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविता येणार असून अपघातांचे प्रमाण देखील कमी होईल. भारतामध्ये असलेल्या राष्ट्रीय महामार्गांपैकी सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग पनवेलमध्ये आहे. ५८४ असा महामार्गाचा क्र मांक आहे. चिंचपाडा जंक्शन ते कळंबोली हा केवळ ४.७ किमीचा महामार्ग आहे. ४१४ कोटी रु पये खर्चून हा महामार्ग देखील विकसित केला जाणार आहे. सध्या या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जेएनपीटी बंदर तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे पनवेलसह संपूर्ण नवी मुंबई शहर हे देशातील व्यस्त शहरामधील एक होणार आहे. साहजिकच वाहतुकीवर याचा सर्वात मोठा परिणाम होणार आहे. त्याकरिताच ही बांधणी करण्यात येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम लवकरच जोर धरणार आहे. तसेच जेएनपीटी चौथ्या टर्मिनसचे काम २०१७ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर या रस्त्यावरील वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या चारही टप्प्याचे काम २०२१ पर्यंत पूर्ण होईल. जे. कुमार, जे.एम.म्हात्रे प्रायव्हेट लिमिटेड, अशोक बिल्डकॉम लिमिटेड आदी कंपन्यांना या महामार्गाच्या उभारणीचे काम देण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांच्या वतीने पाचव्या टप्प्याचेही काम सुरु केले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीच्या वेळी दोन प्रवेशिका तयार करण्यात येणार आहेत. या प्रवेशिका तयार करण्यासाठी सर्व्हेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरुवात केली आहे. लवकरच टेंडर प्रक्रि या पूर्ण करून या कामालाही सुरु वात करण्यात येणार आहे.