आरटीई प्रवेश अर्जात दुरुस्तीची सुविधा, पालकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 11:19 PM2019-05-27T23:19:27+5:302019-05-27T23:19:33+5:30

आरटीईअंतर्गत शाळेत प्रवेशासाठी केलेल्या अर्जात आवश्यक बदल करण्याची सुविधा शिक्षण सहसंचालकांकडून देण्यात आली आहे.

RTE entry application repair facility, parents console | आरटीई प्रवेश अर्जात दुरुस्तीची सुविधा, पालकांना दिलासा

आरटीई प्रवेश अर्जात दुरुस्तीची सुविधा, पालकांना दिलासा

Next

नवी मुंबई : आरटीईअंतर्गत शाळेत प्रवेशासाठी केलेल्या अर्जात आवश्यक बदल करण्याची सुविधा शिक्षण सहसंचालकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पालकांकडून पाल्याचे अर्ज भरताना काही चुका झाल्या असल्यास त्यात ऑनलाइन सुधार करता येणार आहे. त्याकरिता २९ मे ते ४ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली असून या कालावधीत अर्जात सुधार करून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
आरटीईअंतर्गत प्रवेशाची दुसरी सोडत लवकरच निघणार आहे.

तत्पूर्वी ज्या पाल्यांच्या अर्जात काही बदल करायचे असते, ते बदल करण्याची संधी पालकांना दिली जाणार आहे. यासंबंधीचा निर्णय शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. त्याकरिता २९ मे ते ४ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पालकांनी भरलेल्या अर्जाची खात्री केलेली नसेल, त्यांनी अर्ज तपासून खात्री करून घेण्याचे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. त्याशिवाय जे अर्ज पहिल्या लॉटरीत निकाली लागले नाहीत, अशा अर्जदारांनी त्यात दुरुस्ती असल्यास ती करून योग्य शाळांची निवड करण्याचेही आवाहन केले आहे.

Web Title: RTE entry application repair facility, parents console

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.