शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

सोशल मीडियावर कर्फ्यूची अफवा, कोपरखैरणेसह अन्य भागात अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 2:11 AM

कोपरखैरणेसह अनेक भागातील नागरिकांकडून अन्न धान्यासह अत्यावश्यक साहित्यांच्या खरेदीवर जोर दिल्याने बुधवारी सकाळी ठिकठिकाणी गर्दी ओसंडली होती.

नवी मुंबई : शहरातील अनेक भागात जनता कर्फ्यू लावल्याच्या अफवा सोशल मीडियाद्वारे पसरवल्या जात आहेत. त्याच्या भीतीने कोपरखैरणेसह अनेक भागातील नागरिकांकडून अन्न धान्यासह अत्यावश्यक साहित्यांच्या खरेदीवर जोर दिल्याने बुधवारी सकाळी ठिकठिकाणी गर्दी ओसंडली होती.नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नागरिक चिंतीत असतानाच शहरात अफवांचे पीक उठवले जात आहे. घणसोली गावामध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याचे टाळण्यासाठी ग्रामस्थांनी स्वेच्छेने तीन तारखेपर्यंत बंदची घोषणा केली आहे. त्याचे अनुकरण शहरातील इतरही गावांमध्ये करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु सिडको विकसित नोडमध्ये अशाप्रकारे निर्णय घेऊ शकणारी कोणतीही सर्वसमावेशक यंत्रणा नाही. त्यानंतरही काहींनी संपूर्ण कोपरखैरणेत जनता कर्फ्यू लागू होणार असल्याचे मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. बुधवारी सकाळी कोपरखैरणेतील प्रत्येक किराणा दुकानाबाहेर तसेच दूध विक्रेत्यांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणचा पुरवठा संपला आहे. तर अचानक दूध खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढल्याने आपल्याकडील पुरवठा काही तासात संपल्याचे दूध पुरवठादार प्रकाश जाधव यांनी सांगितले.तर बुधवारी दुपारी जुईनगर परिसरात अशाच प्रकारच्या जनता कर्फ्यू लागणार असल्याचे मॅसेज पसरू लागले. सोशल मीडियावर अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले त्यांच्यावर कारवाईची देखील मागणी देविदास हांडेपाटील यांनी पोलिसांकडे केली आहे.