#VidhanSabha2019 : अडचणीच्या वेळी साथ सोडणारे पळपुटे; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 05:28 AM2019-09-16T05:28:06+5:302019-09-16T07:42:11+5:30

अडचणीच्या वेळी केवळ सत्तेसाठी पक्ष सोडून जाणारे पळपुटे आहेत. त्यांना जनता माफ करणार नाही.

Runaway escapes during times of trouble; Criticism of Sharad Pawar | #VidhanSabha2019 : अडचणीच्या वेळी साथ सोडणारे पळपुटे; शरद पवार यांची टीका

#VidhanSabha2019 : अडचणीच्या वेळी साथ सोडणारे पळपुटे; शरद पवार यांची टीका

Next

नवी मुंबई : अडचणीच्या वेळी केवळ सत्तेसाठी पक्ष सोडून जाणारे पळपुटे आहेत. त्यांना जनता माफ करणार नाही. मागील निवडणुकीत मंदा म्हात्रे जिंकल्या होत्या. नाईक यांना त्यांच्याच चुकीमुळे पराभव पत्करावा लागला. त्यानंतर कुठे तरी सुधारणा होईल, असे वाटत होते. मात्र पक्ष बदलून त्यांनी पुन्हा मोठी चूक केली आहे. चुकीला जनता कधीच माफ करीत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणेश नाईक यांच्या पक्षांतराचा समाचार घेतला. तर दिल्लीश्वरांकडून अपमानास्पद वागणूक मिळूनही तह केला, अशा शब्दांत नाव न घेता त्यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली.
नवी मुंबईतील नेरूळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.
सत्ता नाही म्हणून विकास करता येत नाही. त्यामुळे पक्षांतर केले, ही सबब संधिसाधूपणाची आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पक्षांतर करणारे देशाच्या या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्यांच्या बाजूला जाऊन बसत आहेत, ही खेदाची बाब आहे. मुळात विरोधात राहून अधिक विकासकामे करता येतात, असे पवार म्हणाले.
>नवी मुंबईचे शिल्पकार
नवी मुंबईचे शरद पवार हेच शिल्पकार आहेत. गेल्या पाच वर्षांत नवी मुंबईचा काहीच विकास झाला नाही. अशा परिस्थितीत विकासाच्या वल्गना करीत काही लोक पक्षांतर करीत आहेत, असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांचे नाव न घेता लगावला. नवी मुंबईकरांत आजही स्वाभिमान जिवंत आहे. कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नाही,असे ते म्हणाले.

Web Title: Runaway escapes during times of trouble; Criticism of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.