एस. टी. कर्मचा-यांची सुरक्षा वा-यावर, मारहाण करणा-यांवर कडक कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 04:29 AM2017-11-12T04:29:52+5:302017-11-12T04:30:18+5:30

राज्य परिवहन विभाग (एस. टी.)च्या चालक-वाहकांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पनवेल आगाराच्या कार्यक्षेत्रामध्ये सहा महिन्यांमध्ये तब्बल ११ घटना घडल्या आहेत. बस वेळेत न आल्यामुळे व इतर शुल्लक कारणांनी प्रवासी कायदा हातामध्ये घेत आहेत.

S. T. Demand for stringent action against the assailants, after the security of the employees | एस. टी. कर्मचा-यांची सुरक्षा वा-यावर, मारहाण करणा-यांवर कडक कारवाईची मागणी

एस. टी. कर्मचा-यांची सुरक्षा वा-यावर, मारहाण करणा-यांवर कडक कारवाईची मागणी

Next

- नितीन देशमुख

पनवेल : राज्य परिवहन विभाग (एस. टी.)च्या चालक-वाहकांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पनवेल आगाराच्या कार्यक्षेत्रामध्ये सहा महिन्यांमध्ये तब्बल ११ घटना घडल्या आहेत. बस वेळेत न आल्यामुळे व इतर शुल्लक कारणांनी प्रवासी कायदा हातामध्ये घेत आहेत. या घटनांमुळे कर्मचा-यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, मारहाण करणा-यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
पनवेल एस. टी. डेपोमधून २ नोव्हेंबरला पनवेलवरून केळवणला जाणारी बस वाहतूककोंडीमुळे उशिरा पोहोचली. ७.३० वाजताची बस ८ वाजल्यानंतरही आली नाही. बसला उशीर झाल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. नियंत्रण कक्षामधून गाडीला विलंब होण्यासाठीचे कारण सांगितल्यानंतरही प्रवाशांनी ऐकले नाही. प्रवाशांनी आगारप्रमुख विलास गावडे यांच्या निवासस्थानी धडक दिली. त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला; पण वेळेत पोलीस घटनास्थळी आल्यामुळे ते वाचले. आगारप्रमुखांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने डेपो परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. वास्तविक ही पहिली घटना नाही. या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून सहा महिन्यांमध्ये तब्बल ११ वेळा चालक-वाहकांना मारहाण व बसवर दगडफेक केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये मे महिन्यात ३, जून, सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये प्रत्येकी एक व जुलैमध्ये दोन घटना घडल्या आहेत. या घटना कशा थांबवायच्या? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. पनवेल आगारामधून दादर, ठाणे, कल्याण व तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये एस. टी.ची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या परिसरामध्ये बेस्टची सुविधा नाही. एनएमएमटीच्या बसेसची संख्याही कमी असल्यामुळे नागरिकांना एस. टी. बसेस हाच मुख्य आधार आहे.
उरण, पनवेल ग्रामीण, कल्याण व इतर परिसरातील रोडवर प्रचंड खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे बसेस वेळेत पोहोचत नाहीत. उरण रोडवर खड्ड्यांमधून मार्ग काढताना चालकाची कसरत होऊ लागली आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी बसेसचा वेगही वाढवता येत नाही. खराब रस्त्यांमुळे बसेसना वेळ होत असून, दिवसभरातील फेºयाही पूर्ण करता येत नाहीत. चालक, वाहक व परिवहन विभागाचे निरीक्षक नागरिकांना या समस्येविषयी माहिती देत असतात; परंतु प्रवासी ऐकत नाहीत व कर्मचाºयांना शिवीगाळ करतात. अनेक प्रवासी कायदा हातात घेऊन चक्क मारहाण करू लागले आहेत.
चालक-वाहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. अनेक वेळेला ३० ते ४० प्रवासी चालक-वाहकांना धारेवर धरतात. शिवीगाळ करू लागतात. ग्रामीण भागामध्ये समाजकंटक बसेसवर दगडफेक करत आहेत. मे व आॅक्टोबरमध्ये बसेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.

एनएमएमटीची कडक भूमिका
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या चालक व वाहकाला आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सायन-पनवेल महामार्गावर मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. ट्रकचालकाने रिव्हर्स घेऊन बसला धडक दिली होती. एनएमएमटी प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन ट्रक चालकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. यामुळे कर्मचाºयांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, कायदा हातात घेणाºयांना तुरूंगात जाण्याची भीती वाटू लागली आहे. एस. टी. प्रशासनानेही अशाप्रकारे कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.

कडक कारवाई करावी
एस. टी. चालक व वाहकांवर हल्ला करणाºयांवर शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल केला जातो; परंतु या गुन्ह्यामुळे हल्लेखोरांवर जरब बसत नाही. कर्मचाºयांवर हल्ला करणाºयांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा. खुनी हल्ला व खुनाचा प्रयत्न, असे गंभीर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

तारीख मारहाणीचे ठिकाण
१ मे १७ ओ.एन.जी.सी. सिग्नल (चालकाला मारहाण)
१२ मे १७ खांदा कॉलनी सिग्नल (चालकाला मारहाण)
१३ मे १७ वशिवली रस्ता (काचेवर दगड)
१८ जून १७ चिपळागाव (चालकाला मारहाण)
१६ जुलै १७ ओहळा ( वाहकाला मारहाण )
२२ जुलै १७ करंबेली रस्ता ( चालकाला मारहाण)
२२ सप्टेंबर १७ वसप मार्गावर ( चालकाला मारहाण )
३० आॅक्टोबर १७ गव्हाण फाटा (काचेवर दगड)
६ नोव्हेंबर १७ दांडफाटा ( चालकाला मारहाण )


पनवेलहून कल्याण, डोंबिवली, दादर व एम.आय.डी.सी.मध्ये जाणाºया गाड्या वाहतूककोंडी व खराब रस्त्यामुळे उशिरा येतात; पण अधिकाºयांनी वेळापत्रक ठरवताना त्या फेºयांसाठी आणि कोंडीतील वेळ कमी धरल्याने वेळापत्रकाप्रमाणे गाड्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे चालक -वाहकांना प्रवाशांची बोलणी खावी लागतात, प्रसंगी मार खावा लागतो.
- एस. टी. पाटोळे,
सचिव,
कामगार संघटना

Web Title: S. T. Demand for stringent action against the assailants, after the security of the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.