पनवेल : टर्शरी पेडिअट्रिक कार्डिअक केअर आणि सार्वजनिक आरोग्य सेवा पुरवणाऱ्या खारघर येथील श्री सत्य साई संजीवनी सेंटर फॉर चाइल्ड हार्ट केअर अॅण्ड ट्रेनिंग इन पेडिअट्रिक कार्डिअक स्किल्सने २६ नोव्हेंबर रोजी वर्षपूर्ती पूर्ण केली. वर्षपूर्तीच्या निमित्ताने भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या प्रमुख उपस्थित पहिला वर्धापनदिन साजरा करण्यात आला.वर्धापनदिन साजरा करण्यासाठी तसेच १०० पूर्णपणे मोफत आणि यशस्वी हृदयशस्त्रक्रिया साध्य करण्यासाठी २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या केंद्राद्वारे आतापर्यंत ७५०० लहान मुले आणि ५५० गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली असून, नोव्हेंबर २०१८ मध्ये स्थापनेनंतरच्या केवळ एका वर्षात साध्य करण्यात आलेली ही कामगिरी निश्चितच असामान्य आहे. या वेळी यशस्वी हृदयशस्त्रक्रिया करण्यात आलेल्या लहान मुलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.या वेळी पंडित शिवकुमार शर्मा, श्री हरिहरन, शनवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन जाधव आदी उपस्थित होते. या वेळी मोफत शस्त्रक्रिया झालेल्या लहान मुलांचे पालक भारावून गेले होते. त्यांना शस्त्रक्रियांबरोबरच वास्तव्य आणि जेवणाची सोय मोफत करण्यात आली आहे.
सचिन तेंडुलकर यांनी खारघर येथील कार्यक्रमात साधला चिमुकल्यांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 2:22 AM