शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात, स्कूलबसचालकांकडून नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:36 AM

स्कूलबस चालकांच्या मनमानीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वैभव गायकरपनवेल : तालुक्यात स्कूलबस चालकांच्या मनमानीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून अनेक कडक नियमावली करण्यात आली आहे  ; परंतु ती केवळ कागदोपत्री असून, त्यांचे काटेकोर पालन करण्यास स्कूलबस आॅपरेटर व राज्य सरकारही उदासीन आहे.स्कूलबसच्या तुलनेत व्हॅन-रिक्षाचे भाडे कमी असल्याने व्हॅन-रिक्षाला पसंती देतात. मात्र, यामुळे पालकवर्ग मुलांच्या सुरक्षेशी तडजोड करत असल्याचे निर्दशनास आले आहे. त्याशिवाय स्कूलबस फी ठरवणे, मुलांकडून फी जमा करणे आणि स्कूलबस आॅपरेटरला ती देणे, हेही काम शाळा प्रशासनाने करणे अनिवार्य आहे. त्यासाठी शाळा आणि स्कूलबस आॅपरेटर्समध्ये ‘कॉमन स्टँडर्ड अ‍ॅग्रिमेंट’ करणे बंधनकारक आहे. सध्या या कराराला बगल देऊन स्कूलबस चालवण्यात येतात. खांदेश्वरमधील एका बसमध्ये खिडक्यांजवळ जाळी नसल्याने विद्यार्थी खिडकीतून बाहेरच्या दिशेने सर्रास झोकावताना दिसून आले. व्हॅनमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ केला जातो.>चालकांसाठी नियमावलीआयएसआय मार्क असलेली ‘ए’, ‘बी’, ‘सी’ प्रकारची अग्निशमन उपकरणे चालकाच्या कक्षामध्ये (कॅबिन) ठेवलेली असावीत.वाहनाच्या पुढील, मागील बाजूस स्कूलबस असा उल्लेख असावा.बसमध्ये चढण्यासाठी पायरीच्या वरच्या कडेची जमिनीपासूनची उंची ३०० मिलीमीटर पेक्षा जास्त नसावी.बसच्या दोन्ही बाजूस बहिर्वक्र भिंगाचे आरसे अनिवार्य आहेत.बसमध्ये खिडकीच्या कडेला आपत्कालीन दरवाजा असणे गरजेचे आहे.सीसीटीव्ही कार्यान्वित असणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांची निगा राखण्यासाठी शाळेतील कर्मचारी बसमध्ये उपलब्ध असणे गरजेचे आहे.खिडक्यांना लोखंडी जाळी असणे गरजेचे आहे.सुसज्ज प्रथमोपचार पेटी बसमध्ये असणे अनिवार्य आहे.खारघर, कळंबोली, कामोठे, खांदेश्वर, नवीन पनवेल, पनवेल आदीसह पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या ३५० पेक्षा जास्त आहे.नियमानुसार, स्कूलबस मुलांच्या सुरक्षेसंदर्भात असलेल्या सर्व नियमांचे पालन करतात की नाही, हे पाहणे शाळा प्रशासनाचे काम आहे.पनवेलमध्ये १३०० च्या आसपास स्कूलबसेस दररोज रस्त्यावर धावत आहेत. मात्र, नियमांची माहिती असून चालक ते पाळण्यास चालढकल करीत असल्याचे दिसून येत आहे.मुलांना शेळ्या-मेंढ्यांप्रमाणे गाडीत कोंबण्यात येते. मुलांना एकमेकांच्या मांडीवर बसून प्रसंगी उभे राहून प्रवास करावा लागतो.