महाराष्ट्र भवनच्या उभारणीसाठी साकडे; माजी नगरसेवक भरत जाधव यांचं सिडकोला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 01:27 AM2020-12-04T01:27:52+5:302020-12-04T01:28:09+5:30
विशेष म्हणजे शहरात बहुतांशी राज्यांची भवन आहेत. मात्र ‘महाराष्ट्र भवन’ नाही. या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या सूचना सिडकोला दिल्या होत्या.
नवी मुंबई : अनेक वर्षांपासून वाशीतील नियोजित महाराष्ट्र भवनचे काम रखडले आहे. त्यामुळे सिडकोने पुढाकार घेऊन हे भवन निर्माण करावे, अशी मागणी माजी नगरसेवक भरत जाधव यांनी केली आहे.
भरत जाधव यांनी यासंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना गुरुवारी निवेदन दिले आहे. सिडकोने महाराष्ट्र भवनच्या उभारणीसाठी वाशी रेल्वे स्थानकाजवळ भूखंड आरक्षित ठेवला आहे. परंतु भवन उभारण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.
विशेष म्हणजे शहरात बहुतांशी राज्यांची भवन आहेत. मात्र ‘महाराष्ट्र भवन’ नाही. या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या सूचना सिडकोला दिल्या होत्या. परंतु चार वर्षे झाली तरी याबाबत सिडकोकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सिडकोने आतातरी या प्रकरणी सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी भरत जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.