साडेचार हजार टन श्रीफळ श्रीचरणी, ३,४४६ टन सफरचंदांची विक्री : प्रसादासाठी १,३४८ टन साखरेचा गोडवा
By नामदेव मोरे | Published: September 7, 2024 12:31 PM2024-09-07T12:31:07+5:302024-09-07T12:36:35+5:30
Ganesh Mahotsav: गणेशोत्सवामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे, नारळ, साखरेसह उत्सवासाठी आवश्यक पदार्थांना प्रचंड मागणी वाढली आहे. पाच दिवसांत तब्बल ४,६३३ टन नारळांची विक्री झाली आहे. याच कालावधीमध्ये ३,४४६ टन सफरचंद, १,३४८ टन साखरेचीही विक्री झाली.
- नामदेव मोरे
नवी मुंबई - गणेशोत्सवामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे, नारळ, साखरेसह उत्सवासाठी आवश्यक पदार्थांना प्रचंड मागणी वाढली आहे. पाच दिवसांत तब्बल ४,६३३ टन नारळांची विक्री झाली आहे. याच कालावधीमध्ये ३,४४६ टन सफरचंद, १,३४८ टन साखरेचीही विक्री झाली. पुढील पाच दिवसही या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी राहणार आहे.
श्रावण, गणेशोत्सव ते दिवाळी या उत्सव काळात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठी उलाढाल होते. या वर्षी उत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्यामुळे २ ते ६ सप्टेंबर या दिवसांमध्ये मसाला, धान्य व फळ मार्केटमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी होऊ लागली होती. गणरायाला अर्पण करण्यासाठी व मोदकासह जेवणामध्ये वापरण्यासाठी उपयोग होत असल्यामुळे पाच दिवसांमध्ये नारळाची विक्रमी आवक झाली. पाच दिवसांमध्ये तब्बल ४,६३३ टन नारळाची विक्री झाली आहे. गुरुवारी सर्वाधिक १,२६३ टन आवक झाली.
गुळाचाही वाढला खप
बाजार समितीमध्ये सोमवारपासून तब्बल ३,४४६ टन सफरचंदची आवक झाली. याच कालावधीमध्ये १,३४८ टन मोसंबीचीही आवक झाली आहे. उत्सवामध्ये प्रसाद, मोदक व गोडधोड वस्तूंनाही मागणी असल्यामुळे साखरेचाही खप वाढतो. बाजार समितीमध्ये सोमवारपासून १,३४८ टन साखरेची विक्री झाली आहे. जवळपास २५० टन चनाडाळीची व २५५ टन गुळाचा खपही झाला.
पाच दिवसांतील
आवक व बाजारभाव
फळ आवक (टन) बाजारभाव (किलो)
नारळ ४६३३ ९ ते ३२ प्रति नग
सफरचंद ३४४६ ८० ते १६०
साखर १३४८ ३८ ते ४५
मोसंबी १३४८ ३० ते ५०
गूळ २५५ ४८ ते ५७
चनाडाळ २५० ८५ ते ९२
खोबरे १३५ १३० ते १७०
डाळिंब ४५९ ८० ते १६०
पेरू ३१० ३० ते ६०