संदीप जाधव , महाड/दासगाव रायगड महोत्सव साजरा करताना शासनाने येथील सर्व जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपवली होती. यामुळे महोत्सव जरी शासनाचा असला तरी मनमानी मात्र ठेकेदाराची चालली. यामुळे रायगड महोत्सवाच्या प्रारंभीपासूनच मान्यवरांना भाषणाची संधी न देणे, स्थानिकांना विश्वासात न घेणे, स्थानिक माध्यमांना बरोबर न घेणे असे प्रकार दिसून आले. उद्घाटन सोहळ्यात माजी मंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री प्रकाश महेता, स्थानिक आमदार भरत गोगावले, शेकाप नेते जयंत पाटील यांना व्यासपीठावर बसवूनही त्यांना बोलण्याची संधी न देता आयोजकांनी त्यांचा अवमानच केला. तर ज्या गावात हा कार्यक्र म पार पडत होता त्या पाचाड गावच्या सरपंच ज्योती गायकवाड यांना व्यासपीठावरही बोलावण्यात आले नाही. हेच सत्र समारोपाच्या कार्यक्र मातही सुरू राहिले. समारोप सोहळ्याला आयोजकांनी कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना निमंत्रित केले होते. त्यांना व्यासपीठावर बोलावण्यातही आले, मात्र बोलण्याची संधी दिली नाही. यामुळे संतप्त झालेल्या संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांची गाडी अडवली. तावडे यांना धारेवर धरून जाहीर माफी मागण्यास भाग पाडले. हीच स्थिती अन्य मान्यवरांच्या बाबतीतदेखील घडली. व्यासपीठावर बसलेल्या विधान परिषद सभापती हरीभाऊ बागडे यांनादेखील भाषणाची संधी न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
संभाजीराजेंची भाषणाची संधी वगळली
By admin | Published: January 25, 2016 2:44 AM