जुळ्या बहीण-भावाचे दहावीतील गुणही सारखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 02:40 AM2019-05-10T02:40:24+5:302019-05-10T02:41:28+5:30

खारघर येथील जुळ्या बहीण-भावाने सीबीएसई दहावीत गुणांमध्येही समानता राखली आहे. सृष्टी रैना आणि सबब रैना या दोघांनाही जवळपास सारखेच गुण मिळाले आहे.

The same is true in the tenth grade of the twin sister and brother | जुळ्या बहीण-भावाचे दहावीतील गुणही सारखेच

जुळ्या बहीण-भावाचे दहावीतील गुणही सारखेच

Next

पनवेल  - खारघर येथील जुळ्या बहीण-भावाने सीबीएसई दहावीत गुणांमध्येही समानता राखली आहे. सृष्टी रैना आणि सबब रैना या दोघांनाही जवळपास सारखेच गुण मिळाले आहे.
मुंबईतल्या बीपीएलमध्ये काम करणारे संजीव रैना यांची ही दोन जुळी मुले आहेत. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये शिकणारी सृष्टी रैना हिने ९७.८० टक्के तर सबब रैनाने ९५.८० टक्के गुण मिळवत दुप्पट आनंद साजरा केला आहे. भविष्यात अभियंता होण्याचे दोघांचेही स्वप्न आहे. नियमित
अभ्यास, आणि सराव करीत त्यांनी हे यश मिळवले आहे. दोघांच्या यशाबद्दल रामशेठ ठाकूर शाळेचे प्राचार्य राज अलोनी तसेच संस्थापक माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले.

Web Title: The same is true in the tenth grade of the twin sister and brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.