जिल्हाधिकाऱ्यांच्या कारावाईनंतरही समीर वानखेडेंचा बार सुरूच, नोटीस आली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 08:39 AM2022-02-03T08:39:05+5:302022-02-03T08:40:34+5:30

Sameer Wankhede's bar : एनसीबीच्या विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या एपीएमसी मधील बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही हा बार सुरूच असून, परवाना रद्द झाल्याची नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

Sameer Wankhede's bar continues open even after District Collector's action, management says no notice has been issued | जिल्हाधिकाऱ्यांच्या कारावाईनंतरही समीर वानखेडेंचा बार सुरूच, नोटीस आली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे

जिल्हाधिकाऱ्यांच्या कारावाईनंतरही समीर वानखेडेंचा बार सुरूच, नोटीस आली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे

Next

नवी मुंबई : एनसीबीच्या विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या एपीएमसी मधील बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही हा बार सुरूच असून, परवाना रद्द झाल्याची नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. दरम्यान, परवाना रद्दच्या निर्णयाविरोधात वानखेडे हे न्यायालयात जाणार असल्याचे बारच्या कर्मचाऱ्यांकडून समजते.

समीर वानखेडे हे १७ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नावे सद्गगुरू हॉटेल आणि बारचा परवाना काढला होता. मात्र, बार परवाना मिळविण्यासाठी परवानाधारकाचे वय २१ वर्षे असणे आवश्यक असतानाही, समीर वानखेडे हे अल्पवयीन असतानाही त्यांच्या नावे बारचा परवाना कसा मिळाला? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर १४ डिसेंबरला उत्पादन शुल्क विभागाने वानखेडेंना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर दीड महिन्यांनी बारचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परवाना मिळवण्यासाठी अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र, अशा प्रकारचे कोणतेही आदेश मिळाले नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

मागील १८ वर्षांपासून नियमित प्रतिवर्षी परवाना नूतनीकरण केला जात आहे. शिवाय प्रत्येक तीन महिन्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बारची पाहणी व परवान्याची पडताळणी केली जाते. यावेळी देखील अधिकाऱ्यांच्या नजरेतून ही बाब निसटली कशी, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केला परवाना रद्द
ठाणे  : वाशी येथे एनसीबीचे मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या नावावर सद्गुरु नावाचा एक रेस्ट्रो बार आहे. त्याचे लायसन्स ठाणे  जिल्हाधिकारी यांनी रद्द केले  आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार या बारसाठीचा परवाना ऑक्टोबर १९९७ ला दिला होता. परंतु, त्यावेळेस वानखेडे हे सज्ञान नसल्याने त्याचा परवाना लायसन्स रद्द केल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली. तसेच १९९६ मध्ये सिडकोने जी एनओसी दिली होती, तीत या जागेत केवळ रेस्टाॅरंटला परवानगी असून, मद्य विकण्यास मनाई होती. तरीही तिथे मद्यविक्री सुरू होती. या बारचा परवाना ३१ मार्चपर्यंत वैध आहे. शाहरुखच्या मुलाला अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आरोप केले होते.
वानखेडे यांच्या   वयात विसंगती
सज्ञान नसताना बारचा परवाना घेतल्याच्या आरोप होता. यासाठी वानखेडेंच्या जन्मतारखेत म्हणजेच वयात विसंगती असल्याचे कारण दिले आहे. बारला परवाना दिला होता, त्यावेळेस वानखेडे हे सज्ञान नसल्यानेच तो रद्द केला. 

Web Title: Sameer Wankhede's bar continues open even after District Collector's action, management says no notice has been issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.