पनवेलमध्ये महास्वच्छता अभियान, दहा दिवसांची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 11:57 PM2019-05-29T23:57:48+5:302019-05-29T23:58:20+5:30

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पालिका क्षेत्रात महास्वच्छता अभियान राबवले जाणार आहे.

Sanction campaign in Panvel, 10-day campaign | पनवेलमध्ये महास्वच्छता अभियान, दहा दिवसांची मोहीम

पनवेलमध्ये महास्वच्छता अभियान, दहा दिवसांची मोहीम

Next

पनवेल : माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पालिका क्षेत्रात महास्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने १ ते १0 जून दरम्यान हे महास्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. या उपक्रमात पनवेल महानगरपालिकेला देखील सहभागी करून घेतले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली.
स्वच्छता अभियानाकरिता गटार, नाले तसेच पदपथ स्वच्छ करण्यासाठी यंत्रणा श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत पुरविली जाणार आहे. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान उपक्र मात आपला सहभाग असावा यादृष्टीने महास्वच्छता अभियान हा उपक्र म राबविला जाणार असल्याची माहिती परेश ठाकूर यांनी दिली. २ जूनला रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस आहे. त्या दिवशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेच्या वतीने रात्री ८ वाजता प्रसिद्ध गायक व निवेदक अंशुमन विचारे यांचा ‘चाल तुरू तुरू’ हा गाण्यांचा व किश्श्यांचा संगीतमय हास्यकल्लोळ कार्यक्र म पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक वर्ष संपल्यामुळे अनेक जण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, त्या अनुषंगाने जॉब फेअरचे आयोजनही करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी वाय. टी. देशमुख यांनी दिली.
भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Sanction campaign in Panvel, 10-day campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.