शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
3
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
4
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
5
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
7
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
8
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
9
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
10
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
11
TATA IPL Auction 2025 Live: व्यंकटेश अय्यरवर कोलकाताचा मोठा सट्टा; २३.७५ कोटींना घेतले विकत
12
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
13
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
14
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
15
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
16
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
18
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
19
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
20
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

पनवेल महानगरपालिकेत दारूबंदीचा ठराव मंजूर, पालिका क्षेत्रात दारूबंदी करणारी पहिली महानगरपालिका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 7:53 PM

पनवेल महानगर पालिकेत दारूबंदीचा ठराव महासभेत सोमवारी मंजूर करण्यात आला आहे. सत्ताधारी विरोधकांनी सर्वानुमते हा ठराव मंजूर केला आहे . पालिका क्षेत्रात दारुबंदी करणारी पनवेल महानगर पालिका ही राज्यातील पहिली महानगर पालिका ठरली आहे . 

पनवेल : पनवेल महानगर पालिकेत दारूबंदीचा ठराव महासभेत सोमवारी मंजूर करण्यात आला आहे. सत्ताधारी विरोधकांनी सर्वानुमते हा ठराव मंजूर केला आहे . पालिका क्षेत्रात दारुबंदी करणारी पनवेल महानगर पालिका ही राज्यातील पहिली महानगर पालिका ठरली आहे .        यासंदर्भात पनवेल महानगर पालिकेच्या पहिल्या महासभेत दारूबंदीसंदर्भात चर्चा करण्यात आली होती . मात्र त्यांनंतर हा विषय पुन्हा सभागृहासमोर आला नव्हता. आज महासभेत या संदर्भात नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी पीठासीन अधिकारी महापौर डॉ . कविता चौतमोल यांना यासंदर्भात आठवन करून देत दारूबंदीच्या निर्णयाचे काय झाले ? असा प्रश्न विचारात ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रायगड जिल्ह्यातील प्रवेशद्वार म्हणून पनवेल शहराची ओळख आहे . त्यामुळे दारूबंदीचा ठराव आणण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी सत्ताधा-यांवर आरोप करीत सत्ताधारी यासंदर्भात गंभीर नसल्याचा आरोप केला. या ठरावावरून विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यात वयक्तिक शाब्दिक चकमक उडाली . विशेष म्हणजे कोण कोण दारू पितो अशाप्रकारची चर्चा सभागृहात रंगल्याने महापौर डॉ . कविता चौतमोल यांनी सदस्यांना सूचना देत कोणत्याही स्वरूपाची वयक्तिक टिप्पणी कोणावर करू नये . या सभेचे वृत्ताकन करण्यासाठी पत्रकार आले आहेत . त्यामुळे टीका करताना भान ठेवण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला .       यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पालिका हद्दीत दारूबंदीचा ठराव मंजुरी साठी ठेवला . लगेचच सर्व सदस्यांनी हा ठराव एकमताने मंजूर करून घेतला . अशाप्रकारे पालिका क्षेत्रात दारूबंदी करणारी पनवेल महानगर पालिका हि राज्यातील पहिली महानगर पालिका असल्याचे यावेळी आयुक्त डॉ . सुधाकर शिंदे यांनी सभागृहात सांगितले . 

टॅग्स :panvelपनवेल