लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : महाड तालुक्यातील सावित्री नदीपात्रात शासनाची कोणतीही परवानगी न घेता, वाळू उत्खनन करणाऱ्यांविरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात वाळूचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाकडी होडीसह दीड ब्रास वाळू, असा १ लाख २ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.प्रकाश अंनत पवार (५२, मंडळ अधिकारी तुडील रा. तांबट आळी, ता. महाड) यांनी दिलेल्या तक्र ारीनुसार, शुक्रवारी रात्री ८:३०च्या सुमारास मौजे ओवळे गावच्या हद्दीतील नदीपात्रात एक लाकडी होडी व १ लाख २ हजार रुपये किमतीची दीड ब्रास वाळू सावित्री नदीपात्रातून उत्खनन करण्यात येत होती. कोणतीही परवानगी न घेता, महसूल बुडवून, वाळू उत्खनन सुरू आहे. पोलिसांनी बेवारस होडीचा मालक, चालक व अन्य एक व्यक्तीविरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सावित्री नदीपात्रात वाळूची तस्करी
By admin | Published: May 22, 2017 2:15 AM